रिपब्लिकन पक्ष गवई संगमनेर तालुका अध्यक्षपदी बाळासाहेब मोकळ यांची निवड

 

संगमनेर / लोकवेध live न्यूज 

 

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया गवई पक्षाच्या संगमनेर तालुका अध्यक्षपदी खांडगाव येथील आंबेडकर चळवळीतील झुंजार कार्यकर्ते बाळासाहेब सुखदेव मोकळ यांची निवड केली असल्याची घोषणा अहमदनगर जिल्हा अध्यक्ष सुधाकर राव रोहम यांनी पक्षाचे राष्ट्रीय नेते डॉक्टर राजेंद्र गवई साहेब महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष सुबोध जी वाघमोडे यांच्या आदेशान्वये केली असल्याची माहिती दिली आहे

संगमनेर येथे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया गवई पक्षाची महत्त्वपूर्ण बैठक शासकीय विश्रामगृह येथे मीटिंग हॉल येथे जिल्हाध्यक्ष सुधाकरराव रोहम यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली याप्रसंगी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी उत्तर महाराष्ट्राचे अध्यक्ष सुरेश राव देठे सरचिटणीस किशोर भाऊ वाघमारे उत्तर नगर जिल्हाध्यक्ष राजेंद्र घायवट महाराष्ट्र प्रदेश कार्यकारणी सदस्य बन्सी भाऊ घंगाळे जिल्हा उपाध्यक्ष जालिंदर बोरुडे तालुका कार्याध्यक्ष बाळासाहेब गायकवाड रायते गावच्या सरपंच रूपालीताई रोहम सरचिटणीस गौतम रोहम यांच्यासह तालुका कार्यकारणीतील ज्येष्ठ पदाधिकारी मोठ्या संख्येने सदर बैठकीसाठी उपस्थित होते यावेळी जिल्हाध्यक्ष सुधाकरराव रोहम यांनी पक्षाचे राष्ट्रीय नेते डॉक्टर राजेंद्र गवई साहेब यांच्या आदेशानुसार संगमनेर तालुक्यासह अहमदनगर जिल्ह्यात तील काही जिल्हा पदाधिकारी यांच्या पदामध्ये फेरबदल केला असून यामध्ये प्रामुख्याने संगमनेर तालुका हा अतिशय महत्त्वाचा असल्याने संगमनेर तालुक्यासाठी अभ्यासू व जेष्ठ कार्यकर्त्याची तालुकाध्यक्ष म्हणून निवड करण्याची आदेश डॉक्टर राजेंद्र गवई साहेब यांनी दिल्याने पक्षाचे ज्येष्ठ झुंजार कार्यकर्ते बाळासाहेब मोकळ यांची संगमनेर तालुका अध्यक्षपदी निवड केली असून तात्कालीन तालुका अध्यक्ष रमेशराव बनसोडे यांना जिल्हा कार्यकारणीत मानाचे स्थान देत त्यांना कायदेशीर सल्लागार म्हणून प्रमोशन दिले तर तालुका कार्याध्यक्षपदी असणारे जालिंदर बोरुडे यांना त्यांच्या अनुभवानुसार त्यांना थेट उपाध्यक्षपदी नेमणूक केली असून आश्वी गटप्रमुख राजेंद्र भाऊसाहेब जमदाडे पठार भाग प्रमुख वसंत गवाजी खरात तर आश्वी गट संपर्कप्रमुख भारत गायकवाड तर जेष्ठ कार्यकर्ते बाळासाहेब नाना गायकवाड यांना कार्याध्यक्ष म्हणून तर निमगाव जाळी येथील संजय भोसले यांना तालुका उपाध्यक्ष म्हणून तर मालदाड येथील शरद भालेराव यांना तळेगाव गटप्रमुख तसेच राजेंद्र गवळी यांना वडगाव गटप्रमुख विजय अडांगळे यांना निमगाव गटप्रमुख घोषित केले असून जिल्हाध्यक्ष रोहम यांनी वरील पदाधिकाऱ्यांच्या भाविक कार्याला शुभेच्छा देत कार्यकर्त्यांनी संगमनेर तालुक्यातील सर्व गटात आपला संपर्क अभियान राबवून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संकल्पनेतील रिपब्लिकन पक्ष गावोगावी समजून सांगून आगामी येणार जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकांसाठी आता तयारीला लागावे व यापुढील काळामध्ये कोणत्याही आदेशाची वाट न पाहता जिल्हा परिषद नऊ गट व पंचायत समितीच्या 18 गण कार्यकर्त्यांनी निवडणुकीसाठी उभे राहण्यासाठी सज्ज व्हावे यापुढील काळामध्ये नागरिकांच्या विविध समस्या अडचणी पक्षाच्या माध्यमातून सोडवाव्यात व गावोगावी शासन आपल्या दारी विविध दाखले वाटप विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्ती चे प्रश्न नागरिकांच्या वैयक्तिक लाभाच्या योजना विजेचे प्रश्न आदि महत्त्वाच्या प्रश्नाला चालना देऊन नागरिकांच्या समस्या सोडव्यात अशा अपेक्षा जिल्हाध्यक्ष सुधाकरराव रोहम यांनी व्यक्त करून पुढील महिन्यांमध्ये पक्षाचे राष्ट्रीय नेते डॉक्टर राजेंद्र गवई साहेब यांच्या उपस्थितीत भव्य असा मेळावा आयोजित करणार असणारे जिल्ह्याचा सर्व दौरा येत्या काही दिवसांमध्ये तालुका निहाह करणार असून येणाऱ्या सर्व निवडणुकीला सामोरे जाणार असून आपल्या पक्षाचे राष्ट्रीय नेते डॉक्टर राजेंद्र गवई साहेब यांना लोकसभेमध्ये पाठवण्यासाठी कार्यकर्त्यांनी सज्ज व्हावे अशी अपेक्षा व्यक्त करत शुभेच्छा दिल्या यावेळी नवनिर्वाचित तालुकाध्यक्ष बाळासाहेब मोकळ यांनी आदरणीय जिल्हाध्यक्ष सुधाकर रोहम यांनी माला तालुका अध्यक्ष पदाची काम करण्याची जी संधी दिली त्या संधीचं सोनं मी आपल्या नेतृत्वाखाली नक्कीच करेल मी पक्षाचे काम माझ्या गावापासून सुरुवात करणार असून आजही अनेक समाजाचे प्रश्न प्रलंबित असून ते सोडवण्यासाठी माझ्या पदाचा योग्य तो वापर करेल याप्रसंगी उत्तर महाराष्ट्राचे अध्यक्ष सुरेश रावते सरचिटणीस किशोर भाऊ वाघमारे उत्तर नगर जिल्हाध्यक्ष राजू घायवट यांनी आपले मनोगत व्यक्त केले व नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांना शुभेच्छा दिल्या याप्रसंगी संगमनेर तालुक्यातून रिपब्लिकन पक्षाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते यामध्ये प्रामुख्याने सुनील रुखवते बाजीराव रुपवते प्रफुल्ल मोकळ समाधान मोकळ सुनील मोकळ गणेश गायकवाड जालिंदर बोरुडे राजू अहिरे पप्पू गवळी गुड्डू बनसोडे गोरक्षनाथ बनसोडे रमाताई पवार अशोकराव वैराळ सतीश राव अभंग अमोल गायकवाड विजया अडांगळे नितीन जमदाडे रामदास भालेराव सर प्रवीण भोसले सौरभ वाघमारे आधी युवा कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी बाळासाहेब मोकळ यांची तालुकाध्यक्षपदी निवड झाल्यानंतर जिल्हाध्यक्ष माननीय सुधाकरराव रोहन यांच्या नेतृत्वाखाली व उत्तर महाराष्ट्राचे अध्यक्ष सुरेश राव देठे सरचिटणीस किशोर भाऊ वाघमारे जिल्हा सरचिटणीस तुकाराम जाधव सर उत्तर नगर जिल्हाध्यक्ष राजेंद्र घायवट यांच्या नेतृत्वाखाली भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाच्या घोषणा देत शासकीय विश्रामगृह ते भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापर्यंत मोठ्या संख्येने कार्यकर्त्यांनी पायी जात शहरातील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराज क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिराव फुले साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याला पुष्पहार घालून वंदन केले व बुद्ध वंदना घेतली व कार्यक्रमाचा समारोप केला

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!