मागील वर्षाची अतिवृष्टीचे नुकसान भरपाई शेतकऱ्यांच्या खात्यावर येथे आठ दिवसात तात्काळ जमा करा अन्यथा तीव्र आंदोलन छेडले जाईल दाढ खुर्द येथील शेतकऱ्यांचा सत्ताधारी सरकारला इशारा

 

दाढ खुर्द / लोकवेध live न्यूज 

 

मागील वर्षी खरीप हंगामामध्ये अत्यंत अतिवृष्टी झाल्यामुळे येथील असणारे खरिपातील कपाशी मठमुक्तूर बाजरी सोयाबीन कांदा भाजीपाला आधी प्रमुख पिके पूर्णपणे नासाडी होऊन वाया गेल्यामुळे येथील शेतकऱ्यांच्या मागणीमुळे मागील वर्षी अतिवृष्टीचा महसूल व कृषी प्रशासनाने पंचनामे करून याद्या शासनाकडे अनुदान मागणीसाठी पाठवले असून चक्क याद्या पाठवून वर्ष होत आले आहे तरी येथील शेतकऱ्यांना एक रुपयाची मदत न मिळाल्यामुळे दाढ खुर्द येथील शेतकरी आंदोलन करण्याच्या पावित्र्यात असून सदर शेतकरी यांनी सरकारचा जाहीर शब्द निषेध व्यक्त केला असून हे सरकार शेतकऱ्याचे नसून व्यापाऱ्याचे आहे या सरकारने शेतकऱ्यावर फार मोठा अन्याय केला असून या सरकारच्या काळामध्ये शेतकरी कर्जबाजारी झाला असून फक्त घोषणाबाजी करत असून प्रत्यक्ष मात्र अंमलबजावणी काहीच होत नाही

सरकारचा जर धाक अधिकाऱ्यांवर होता तर सदर अधिकाऱ्यांनी एवढ्या दिवसांमध्ये शेतकऱ्याचे पैसे तातडीने द्यायला पाहिजे होते परंतु तसे न करता मागील पंधरा दिवसांमध्ये विद्यमान मुख्यमंत्री माननीय नामदार एकनाथजी शिंदे साहेब यांनी शेतकऱ्याला पंधरा दिवसात अनुदान वाटप करा असे आदेश केल्याने तलाठी वर्ग जागा झाला असून तलाठ्याने चक्क शेतकऱ्यांना गावातील एका सेतूचालकाकडे येलपटे मारायला लावले असून सदर सेतू चालकाकडे वर्षात अक्षरशः दोन वेळा आधार कार्ड व बँक पासबुक जमा करा असे निर्देश दिले वास्तविक तलाठी यांनी स्वतः शेतकऱ्यांचे बँक पासबुक व आधार कार्ड तलाठी ऑफिस मध्ये गेल्या काही महिन्यापूर्वी जमा केले होते तरीपण आता मागील आठवड्यामध्ये पुन्हा बँक पासबुक व आधार कार्ड व आठ उतारा सेतू चालकाकडे जमा करायला सांगितला सेतू चालकांनी सुद्धा त्यांच्यासौडीअंती त्यांना जसा वेळ असेल त्याप्रमाणे तीन-चार दिवस ज्या शेतकऱ्यांना माहिती झाली त्या शेतकऱ्यांनी कागदपत्रे गावातील सेतू चालकाकडे जमा केली परंतु ज्यांना माहित नाही त्यांचे मात्र कागदपत्र तसेच प्रलंबित आहे त्यातच या गावाला तलाठी नसल्याने शेतकऱ्याची मोठी होत असून दोन्हीही गावे चनेगाव व दाढ खुर्द येथील शेतकऱ्याला अक्षरशा सेतू चालकाच्या दारामध्ये उन्हामध्ये त्यांची वाट बघायची वेळ आली असून तलाठ्याने मात्र येथील माझ्यावर अतिरिक्त भार असून तुम्ही सेतू चालकाकडे झेरॉक्स जमा करा असे म्हणून हात झटकून मोकळे झाले त्यामुळे शेतकऱ्याची येथील मोठी कोथिंबीर होत असून शेतकऱ्याची अक्षरशा शासनाने चेष्टा केली असून शिवसेनेचे महसूल मंत्री असूनही शेतकऱ्यांना योग्य तो न्याय भेटत नसून येथील शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली असून अक्षरशः दुसरा हंगाम आता येत असून चार दिवसांनी नव्याने पेरणी करायची असून शेतकऱ्यांनी बी घेण्यासाठी तरी शासनाने अनुदान बँकेत वर्ग करावे जेणेकरून त्या अनुदानामध्ये यावर्षी तरी बी व रासायनिक खते घेऊन चालू वर्षी कपाशी तूर मत मूग सोयाबीन बाजरी कांदे असे पिके घेता येतील अशी अपेक्षा व्यक्त केली असून सरकारने येत्या 12 तारखेपर्यंत तात्काळ अनुदान वर्ग करावे अन्यथा येथील शेतकरी आंदोलनाच्या पवित्रत असल्याचे दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे त्यामुळे येथील तलाठ्यांनी तात्काळ शेतकऱ्याची अपूर्ण कागदपत्रे पूर्तता करून येथे आठ दिवसांमध्ये अनुदान शेतकऱ्याच्या खात्यावर तात्काळ जमा करावे अशी अपेक्षा येतील शेतकऱ्यांनी शासनाकडे व्यक्त केली आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!