अहमदनगर जिल्हा अनुसूचित जाती काँग्रेसने आंदोलन हाती घेतले पाहिजे. – मा.सौ.प्रियांका रणपिसे

 

शिर्डी / लोक वेध live न्यूज 

 

अहमदनगर जिल्हा काँग्रेस कमिटी अनुसूचित जाती विभागाची आढावा बैठक शिर्डी हॉटेल साई पासो येथे काल संपन्न झाली.
यावेळी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या उपाध्यक्ष तथा अहमदनगर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या प्रभारी प्रियांका रणपिसे अध्यक्ष स्थानावरून बोलत होत्या यावेळी त्यांनी जिल्हा काँग्रेस कमिटीला अनेक सूचना केल्या आपल्याला महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी अनेक वेळेस विविध उपक्रम राबवण्यात देत असते त्या पद्धतीने जिल्हा काँग्रेस कमिटीने आपले काम केले पाहिजे.अनुसूचित जिल्हा काँग्रेस कमिटी यांनी आंदोलन हातात घेतले पाहिजे प्रत्येक आंदोलनामध्ये आपण सक्रिय राहून सर्वसामान्य नागरिकांच्या हक्क अधिकारासाठी शासनाकडे लढा दिला.पाहिजे संविधान रक्षक अभियान अनुसूचित जाती विभागाच्या वतीने जास्तीत जास्त सभासद नोंदणी करावी. अखिल भारतीय काँग्रेस कमिटीने ठरवून दिलेला एल.डी.एम.अभियानही आपण लवकर अहमदनगर जिल्ह्यात राबवणार आहोत.ऍट्रॉसिटी कॉर्डिनेटर जिल्ह्यात नेमणूक करून त्याचा आढाव घेऊन लवकरात लवकर प्रदेश कमिटीकडे देणार आहोत
यावेळी महिला आयोगाच्या सदस्या उत्कर्षा रूपवते यांनीही आपल्या भाषणामध्ये काँग्रेसच्या अनेक भूमिका कार्यकर्त्यांना समजावून सांगितल्या
जिल्हाध्यक्ष राजेंद्र वाघमारे यांनी स्व.दादासाहेब रुपवते व स्व. प्रेमानंद उर्फ बाबूजी रुपवते यांच्या विषयी काँग्रेसची तळमळ व्यक्त करताना वाघमारे यांना अश्रू अनावर झाले
स्व.दादासाहेबांनी व स्व.बाबूजींनी काँग्रेसचे विचार तळागाळापर्यंत सर्वसामान्य माणसापर्यंत पोहोचवण्याचे अत्यंत प्रामाणिक व निष्ठेने केले तोच वारसा घेऊन उत्कर्षा रुपवते ही काम करतात याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे.आम्हीही त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून काँग्रेसच काम करत आहोत
जिल्ह्यात काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आमदार बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली अनुसूचित जाती विभाग काम करत आहे
यावेळी प्रदेश काँग्रेसचे महासचिव बंटी यादव यांनीही आपले विचार व्यक्त करतानी शिर्डी लोकसभा मतदारसंघाबाबत आपली भूमिका स्पष्ट करत यावेळी शिर्डी लोकसभा मतदारसंघाची उमेदवारी यावेळेस काँग्रेसने बौद्ध समाजाला द्यावी कारण या मतदारसंघातील बौद्ध समाज आमदार थोरात यांच्या कायम बरोबर आहे आणि आमदार बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसचा उमेदवार विजय होईल यात काही शंका नाही
यावेळी प्रदेश काँग्रेसचे नितीन शिंदे, शहर काँग्रेसचे अध्यक्ष सचिन चौगुले,पुणे काँग्रेसच्या अश्विनी माने,अहमदनगर जिल्हा काँग्रेसच्या शिल्पा दुसुंगे,काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नामदेव चांदणे, कोपरगाव तालुका काँग्रेसचे अध्यक्ष चंद्रकांत बागुल, कार्याध्यक्ष संतोष गायकवाड, शिर्डी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मामा पगारे आदींनी आपले मनोगत व्यक्त केले.
यावेळी बैठकीचे प्रास्ताविक जिल्हा काँग्रेसचे कार्याध्यक्ष संतोष गायकवाड यांनी केले तर
सूत्रसंचालन युवक काँग्रेसचे स्वराज त्रिभुवन यांनी केले
यावेळी नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांना जिल्हा प्रभारी प्रियांका रणपिसे यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देण्यात आले
या बैठकीसाठी
प्रदेश उपाध्यक्ष प्रियंका रणपिसे महिला आयोगाच्या सदस्या उत्कर्षा रुपवते,प्रदेश काँग्रेसचे बंटी भाऊ यादव, जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष राजेंद्र वाघमारे,जिल्हा काँग्रेसच्या शिल्पा दुसुंगे,काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नामदेव चांदणे, किसान काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष विजय जाधव, जिल्हा सरचिटणीस उमेश शेजवळ, सोशल मीडियाचे जिल्हाध्यक्ष सचिन बोर्डे, उपाध्यक्ष यादव त्रिभुवन, परिवहन काँग्रेसचे छबुराव शिंगाडे,चंद्रहरी जगताप, नेवासा युवक काँग्रेसचे वैभव वाघमारे सोशल मीडिया काँग्रेसचे उदय अभंग, सोमनाथ पगारे,शहर काँग्रेसचे अध्यक्ष दत्ता वाघचौरे,रवींद्र शिंदे, बाळासाहेब भोसले,सुरेश खामकर,आधी जिल्ह्यातील काँग्रेस पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी कार्यक्रमाचे आभार कोपरगाव तालुका काँग्रेसचे अध्यक्ष चंद्रकांत बागुल यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!