जाखुरीच्या सरपंचाला ठेकेदाराकडून पैसे मागणे व सदस्यांना विश्वासात न घेणे भोवले ; सरपंचावर अविश्वास ठराव मंजूर
सरपंच पदाची माळ कुणाच्या गळ्यात ग्रामस्थांचे लक्ष
पिंपरणे / लोकवेध live न्यूज 
    संगमनेर तालुक्यातील जाखूरीचे सरपंच नितीन बबन पानसरे यांच्याविरोधातील अविश्वास ठराव तहसीलदार धीरज मांजरे यांच्या उपस्थितीत झालेल्या सर्व ग्रामपंचायत सदस्यांच्या बैठकीत संमत करण्यात आला आहे.
    संगमनेर तालुक्यातील जाखुरी येथील सरपंच उपसरपंच सदस्य यांच्याकडून  राजकीय हवेदावे गट तट आणि की राजकीय जोडे बाजूला ठेवून ग्रामपंचायत मध्ये फक्त गावाच्या सर्वांगीन विकाससाठी तुम्ही सर्वांनी एका दिलाने काम करावे असे असे ग्रामस्थांना अपेक्षित होते
       अडीच वर्षाच्या कालावधीत सरपंच नितीन पानसरे यांनी ग्रामपंचायतच्या एकाही सदस्याला विश्वासात न घेता आपल्या मर्जीप्रमाणे काम करणे, बेजबाबदारपणे वागणे, ठेकेदारांकडून कामाच्या मोबदल्यात पैशांची मागणी करणे यामुळे सरपंच यांच्या व्यतिरिक्त ग्रामपंचायतच्या इतर सर्व आठ सदस्यांनी एकत्र येत सरपंचांच्या मनमानी कारभारा विरुद्ध तहसीलदार धीरज मांजरे यांच्या कडे ११ जुलैला अविश्वास ठराव सादर केला. त्या अनुषंगाने तहसीलदार यांच्या आदेशानुसार सोमवार दिनांक १७ रोजी अकरा वाजता सरपंच सह सर्व सदस्यांची बैठक बोलावण्यात आली
     तहसीलदार धीरज मांजरे व ग्रामसेविका गोसावी मॅडम यांनी ग्रामपंचायत कार्यालयात झालेल्या बैठकीमध्ये सरपंचांविरुद्धच्या अविश्वास ठरावावर चर्चा करून सरपंच नितीन पानसरे यांच्या व्यतिरिक्त आठ सदस्या पैकी सर्व सदस्यांनी अविश्वास ठरावाच्या बाजूने हात वर केले त्यामुळे ८ विरुद्ध एक अशा मताने ठराव संमत झाला. सरपंच नितीन पानसरे यांनी आपले म्हणणे मांडण्यास यावेळी नकार दिला
आता या गावच्या सरपंच पदाची माळ नेमकी कोणाच्या गळ्यात पडते याकडे आता संपूर्ण गावाचे लक्ष लागून आहे
 आपण कुठे अपील करणार नाही मी कुठलेही ठेकेदाराकडून पैसे घेतले नाही किंवा मागितले ही नाही तसेच गावात विकास होत असतात ना प्रत्येक सदस्याला विश्वासात घेऊन काम केले. गावच्या इतिहासात आजपर्यंत कोणत्याही सरपंचाने शिव रस्ता काढला नाही या उलट पुढारी व त्यांच्या पाहुण्यांनी अतिक्रमण केली तो शीव रस्ता काढण्याचं मोठं काम माझ्या हातून झाल्यामुळे नाराज गाव पुढारी व सदस्य यांनी मिळून हा कट रचला. त्यांनी या प्रकारे राजकारण करायला नको होते
मा. सरपंच नितीन पानसरे 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!