शिर्डी लोकसभा उमेदवारीसाठी राजेंद्र वाघमारे यांच्या बाबत ए.आय.सी.सी. शी बोलणार – भा.ई.नगराळे
अहमदनगर / लोक वेध live न्यूज
काल अहमदनगर जिल्हा काँग्रेसच्या मीटिंगसाठी जात असताना नेवासा फाटा येथे राजेंद्र वाघमारे यांच्या निवासस्थानी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष भा.ई.नगराळे यांनी धावती भेट दिली.
यावेळी ते पदाधिकाऱ्यांशी बोलत होते अहमदनगर जिल्हा काँग्रेस कमिटी अनुसूचित जाती विभागाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र वाघमारे गेली चाळीस वर्ष काँग्रेसचे प्रामाणिक असून कित्येक वर्ष त्यांनी निष्ठेने काम केलेले आहे.म्हणून मी त्यांना शिर्डी लोकसभेच्या उमेदवारीसाठी अखिल भारतीय काँग्रेस कमिटीशी चर्चा करेल.
यावेळी भा.ई.नगराळे यांचा सत्कार जिल्हाध्यक्ष राजेंद्र वाघमारे, मुळा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन कडू पाटील कर्डिले, अहमदनगर जिल्हा काँग्रेसचे अभिजीत लुनिया, नेवासा तालुका काँग्रेसचे अध्यक्ष संभाजी माळवदे, अहमदनगर जिल्हा परिवहन काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष संदीप मोटे, जिल्हा काँग्रेसचे सरचिटणीस कमलेश गायकवाड, नेवासा युवक काँग्रेसचे वैभव वाघमारे, ग्रामपंचायत सदस्य संकेत वाघमारे
आधी यावेळी पदाधिकारी उपस्थित होते
