संगमनेर शिवसेनेच्या वतीने किरीट सोमय्या च्या प्रतिमेस जोडेमारो आंदोलन व निषेधार्थ घोषणाबाजी

 

संगमनेर / लोकवेध live न्यूज 

संगमनेर शिवसेनेच्या वतीने मंगळवार दि .१८ रोजी दुपारी १२ वाजता संगमनेर बस स्थानक समोर किरीट सोमय्या यांच्या निषेधार्थ घोषणाबाजी व किरीट सोमय्या यांच्या प्रतिमेस जोडी मारो आंदोलन करण्यात आले काल टीव्ही चॅनल न्यूजने  सोमय्या यांच्या अश्लील चाळेची भांडीफोड केली  अनेक लोकांना ब्लॅकमेल करणाऱ्या व स्त्रीलंपट असणाऱ्या या किरीट सोमय्यांचा पर्दाफाश केल्यामुळे व निर्भीडपणे आपल्या वृत्तवाहिनीवर  न्यूज दाखवल्यामुळे  न्यूज च्या सर्व टीमचे मनापासून आभार तसेच सदर अश्लील कृत्य करणाऱ्या किरीट सोमय्यांची भाजप पक्षातून त्वरित हकालपट्टी करून त्याच्यावर योग्य ती पोलीस कारवाई करावी या हेतूने संगमनेर शिवसेनेच्या वतीने संगमनेर बस स्थानकांसमोर सदर आंदोलन करण्यात आले सदर आंदोलन करताना शिवसेना शहर प्रमुख अमर कतारी यांनी तीव्र शब्दात आपल्या भावना व्यक्त केल्या व किरीट सोमय्या यांचा निषेध व्यक्त केला व त्यांची भाजप पक्षातून त्वरित हकालपट्टी करण्याची मागणी केली सोबत उत्तर नगर जिल्हा प्रमुख मुजीब शेख यांनी देखील सदर कृत्याचा निषेध व्यक्त केला भाऊसाहेब हासे तालुका प्रमुख यांनी देखील सोमय्या दिसेल तिथे काळे फासण्याचे जाहीर केले ,यावेळी महिला आघाडीने पदाधिकाऱ्यांनी तालुका संघटिका शीतल हासे अशा केदारी संगीता गायकवाड वैशाली वडतल्ले ,यांनी देखील आपल्या भावना व्यक्त केल्या व सोमय्या यांच्या प्रतिमेस जोडे मारून आपला राग व्यक्त केला यावेळी शिवसेना युवा सेना महिला आघाडी व सर्व अधिकृत संघटनाचे पदाधिकारी उपस्थित होते युवा सेना जिल्हाप्रमुख अमित चव्हाण पठार भाग तालुकाप्रमुख संजय फड युवा सेना शहर प्रमुख गोविंद नागरे अमोल डुकरे अक्षय बिल्लाडे शोएब शेख ज्येष्ठ शिवसैनिक रावसाहेब गुंजाळ विजुभाऊ सातपुते राजू सातपुते उपशहर प्रमुख दीपक वनम अजीज मोमीन प्रकाश क्षत्रिय युवा सेनेचे योगेश खेमनर लखन सोन्नर शिवसैनिक विकास डमाळे शरद कवडे सचिन साळवे अक्षय गाडे यांनी जोरदार घोषणाबाजी केली व सोमय्याचा निषेध व्यक्त केला

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!