जिल्हा अध्यक्ष राजेंद्र वाघमारे यांचा संगमनेर काँग्रेस कमिटी च्या वतीने सत्कार
संगमनेर / लोकवेध live न्यूज
अहमदनगर जिल्हा काँग्रेस कमिटी अनुसूचित जाती विभागाचे जिल्हा अध्यक्ष राजेंद्र वाघमारे यांचा धावता दौरा संगमनेर शासकीय विश्राम गृह संगमनेर येथे आला असता,
त्यांचा सत्कार शहर काँग्रेसच्या व तालुका काँग्रेसच्या वतीने तालुकाध्यक्ष रवींद्र शिंदे व शहराध्यक्ष दत्ता वाकचौरे यांनी केला.
यावेळी प्रदेश काँग्रेसचे महासचिव बंटी भाऊ यादव, आंबेडकरी चळवळीचे जेष्ठ युवानेते तथा सकल मातंग समाज संघटनेचे उत्तर नगर जिल्हाध्यक्ष मा.मंजाबापू साळवे,अण्णाभाऊ साठे संघटनेचे जिल्हाध्यक्ष विलासभाऊ कदम, जिल्हा काँग्रेसचे कार्याध्यक्ष संतोषजी गायकवाड,काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष दीपक खरात, शहर काँग्रेसचे अध्यक्ष दत्ता शेठ वाकचौरे,संगमनेर शहर काँग्रेसचे उपाध्यक्ष सुरेशजी खामकर, पत्रकार भीमा उघडे
यावेळी सकल मातंग समज संघटनेचे उत्तर नगर जिल्हाध्यक्ष मंजाबापू साळवे म्हणाले की शिर्डी लोकसभेसाठी राजेंद्र वाघमारे काँग्रेस कडून उमेदवारी करत असेल तरी शिर्डी लोकसभा मतदारसंघातील सकल मातंग समाज वाघमारे यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहील त्यासाठी आम्ही गावोगावात जाऊन मातंग समाजाला वाघमारे साहेबांच्या पाठीशी उभे करू,
यावेळी विलास कदम ही म्हणाले की मातंग समाजाबरोबरच अठरापगड समाज आपल्याबरोबर राहील यासाठी शिर्डी लोकसभा मतदारसंघातील सर्व संघटनेच्या नेत्यांशी मी गाठीभेटी घेईल आणि त्यांनाही आपल्या पाठीशी उभ करील
यावेळी युवक काँग्रेसचे वैभव वाघमारे, भीमा उघडे आधी पदाधिकारी उपस्थित होते
