रविवारी पिंपळगाव कोंझिरा येथे दंडकारण्य अभियानाचा शुभारंभ
आमदार थोरात, मा.आमदार डॉ. तांबे यांची उपस्थिती
संगमनेर / लोकवेध live न्यूज
पर्यावरण संवर्धनाची लोकचळवळ बनलेल्या दंडकारण्य अभियानाच्या 18 व्या वर्षाचा शुभारंभ रविवार दिनांक 23 जुलै 2023 रोजी सकाळी 9 वा. कनकेश्वर डोंगर, पिंपळगाव कोंझिंरा येथे काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते आमदार बाळासाहेब थोरात व अभियानाचे मुख्य प्रवर्तक माजी आमदार डॉ. सुधीर तांबे यांच्या उपस्थितीत होणार असल्याची माहिती प्रकल्प प्रमुख सौ दुर्गाताई तांबे यांनी दिली आहे.
याबाबत अधिक माहिती देताना सौ तांबे म्हणाल्या की सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात यांच्या संकल्पनेतून सुरू झालेल्या दंडकारण्य अभियानाचे हे 18 वे वर्षे आहे. आमदार बाळासाहेब थोरात व माजी आमदार डॉ सुधीर तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यातील उघड्या बोडक्या डोंगरांवरती बिजारोपण वृक्षारोपण करण्यात आले आहे. यातून तालुक्यात हिरवाई निर्माण झाली असून वृक्ष संवर्धन संस्कृती वाढली आहे. या अभियानाची आंतरराष्ट्रीय पातळीवर दखल घेतली गेली असून यामध्ये तालुक्यातील अबाल वृद्धांसह विद्यार्थ्यांचा मोठा सहभाग राहिला आहे.
सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात अमृतवाहिनी बँकेच्या पुढाकारातून यावर्षी पिंपळगाव कोंझिरा येथील कनकेश्वर डोंगरावर शुभारंभाचा कार्यक्रम काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते आमदार बाळासाहेब थोरात ,माजी आमदार डॉ सुधीर तांबे, आमदार सत्यजित तांबे, बाजीराव पा.खेमनर, ॲड. माधवराव कानवडे, रणजीत सिंह देशमुख ,बाबासाहेब ओहोळ, कॅन्सरतज्ञ डॉ जयश्रीताई थोरात, शंकरराव पा. खेमनर, इंद्रजीत भाऊ थोरात, संपतराव डोंगरे, सुधाकर जोशी, रामहरी कातोरे, हौशीराम सोनवणे ,राजेंद्र गुंजाळ, मिलिंद कानवडे ,सोमेश्वर दिवटे, सौ अर्चनाताई बलोडे, प्रा. बाबा खरात, विष्णुपंत रहाटाळ, ॲड .मधुकरराव गुंजाळ ॲड नानासाहेब शिंदे आदींसह अमृत उद्योग समूहातील विविध संस्थांचे पदाधिकारी व मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
तरी या शुभारंभ कार्यक्रमासाठी पिंपळगाव कोंजीरा सह परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन दंडकारण्य अभियान समिती ,जयहिंद लोकचळवळ, पिंपळगाव कोंझिरा ग्रामस्थ व अमृतवाहिनी बँकेच्या वतीने करण्यात आले आहे..
