सैनिकांच्या दातृत्वातून पोखरी हवेली शाळेला मिळाले पाणी

 

संगमनेर / लोकवेध live न्यूज 

तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पोखरी हवेली या शाळेत पिण्याच्या पाण्याची स्वतंत्र अशी व्यवस्था नव्हती.ही गरज लक्षात घेऊन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर यांच्या मिशन आपुलकी या उपक्रमांतर्गत गावातीलच सेवानिवृत्त सैनिक दत्तात्रय रायभान थिटमे व सेवानिवृत्त सैनिक दत्तात्रय तानाजी गवांदे यांनी शाळेला कुपनलिकेच्या स्वरूपात पाणी उपलब्ध करून दिले. तसेच कुपनलिकेतून पाणी उचलण्यासाठी विद्युत पंपाची आवश्यकता होती. या विद्युत पंपासाठी व सर्व साहित्यांसाठी शाळेतीलच उपक्रमशील पदवीधर शिक्षक आर जी पावसे यांनी सर्व खर्चाची जबाबदारी उचलली.
हे पाणी कुपनलिकातून बाहेर येताच शिक्षक विद्यार्थी व ग्रामस्थांनी आनंद व्यक्त करत एकच जल्लोष केला. याप्रसंगी ग्रामपंचायतचे उपसरपंच सोमनाथ थिटमे, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सचिन आगळे, उपाध्यक्ष संदीप खैरे, सेवानिवृत्त सैनिक दत्तात्रेय थिटमे,मच्छिंद्र घुले, तृषान्त उदमले,दिनकर घुले,सुखदेव थिटमे,शिवाजी कडलग,गोरख गवांदे, मुख्याध्यापक तथा वडगाव पान केंद्राचे सहाय्यक केंद्रप्रमुख एकनाथ साबळे, पदवीधर शिक्षक आर.जी.पावसे, सुरेश साळुंके, शकुंतला शेळके, दस्तगीर शेख, सखाराम पाटील, राजेंद्र सूर्यवंशी,सोमनाथ मदने आदींसह ग्रामस्थ व विद्यार्थी उपस्थित होते.
. शाळेसाठी पाण्याची स्वतंत्र व्यवस्था झाल्याने सरपंच सुदाम खैरे,गटविकास अधिकारी अनिल नागणे, गटशिक्षणाधिकारी बाळासाहेब गुंड,विस्ताराधिकारी दीपक त्रिभुवन यांनी सर्व दात्यांचे अभिनंदन केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!