विद्यार्थ्यांच्या हाती दिलेले मोबाईल देवदूत ऐवजी बनले डोकेदुखी – किसनभाऊ हासे

संगमनेर / लोकवेध live न्यूज 

अभ्यासासाठी कोरोना काळात पालकांनी आपल्या पाल्याला उधार पैसे घेऊन किंवा कर्ज काढून खरेदी करून दिलेले मोबाईल विद्यार्थ्यांच्या दृष्टीने आज देवदूत बनण्याऐवजी डोकेदुखी बनत चालले आहे असे प्रतिपादन दैनिक युवावार्ताचे संपादक व ज्येष्ठ पत्रकार किसन भाऊ हासे यांनी शहरातील गोखले एज्युकेशन सोसायटीच्या सर डी एम पेटिट विद्यालय व ज्युनिअर कॉलेजच्या शिक्षक – पालक मेळाव्या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना व्यक्त केले. प्रभारी प्राचार्या डॉ. अस्मिता देशपांडे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या कार्यक्रमाप्रसंगी व्यासपीठावर पत्रकार किसन भाऊ हासे , इन्चार्ज प्रा. गुलाब गायकवाड , ज्येष्ठ प्रा. दशरथ गभाले आदी मान्यवर उपस्थित होते. प्रारंभी संस्थेचे सचिव स्वर्गीय सर डॉ मो.स. गोसावी यांना सामूहिक श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. याप्रसंगी शिक्षक – पालक संघाची कार्यकारणी निवडण्यात आली ती पुढील प्रमाणे- अध्यक्ष प्राचार्या डॉ. अस्मिता देशपांडे , उपाध्यक्ष सौ .मंगल हरनामे , सचिव इन्चार्ज प्रा. गुलाब गायकवाड ,सहसचिव महेंद्र अस्वले , प्रा. दशरथ गभाले (शिक्षक प्रतिनिधी) ११वी कला-प्रा. देशमुख रूपाली, शेख बुशरा (सदस्य), ११वी वाणिज्य- प्रा. जाधव उषा, शेख नासीम (सदस्य),११वी विज्ञान- प्रा.मिश्रा सिमिका, श्री प्रकाश जमधडे (सदस्य), १२ वी कला- प्रा. चिमणकर सुशीला, श्री अनाप सुनील (सदस्य) ,१२ वी वाणिज्य- प्रा.परेश सांगवीकर, सुरेश खामकर (सदस्य) ,१२ वी विज्ञान- प्रा.अमोल टेमक , सौ राजवंती दारोळे (सदस्य) . नवनिर्वाचित कार्यकारणीतील उपाध्यक्ष, सहसचिव , सदस्य यांचा प्रमुख पाहुण्याच्या हस्ते सत्कार करण्यात आला. हासे पुढे बोलताना म्हणाले की, शिक्षण व पत्रकारिता यांचा जवळचा संबंध आहे. शिक्षण हे समाजभिमुख असावे. विद्यार्थ्यांनी मोबाईलचा अतिरेक टाळावा. इंस्टाग्राम, फेसबुक , व्हाट्सअप च्या अतिवापरामुळे भविष्यात विद्यार्थी मनोरुग्णांची संख्या वाढण्याची भीती हासे यांनी यावेळी व्यक्त केली. अध्यक्ष भाषणात डॉ. देशपांडे म्हणाल्या की, पालकांनी मुलांना कॉलेजमध्ये मोबाईल देऊ नये. मागील वर्षापासून आमच्या कॉलेजमध्ये मोबाईल बंदी आहे. पालकांनी वेळोवेळी कॉलेजमध्ये येऊन आपल्या पाल्याच्या अभ्यासाविषयी चौकशी करावी. पालक सभेसाठी पालकांनी वेळ द्यावा असे आवाहनही याप्रसंगी डॉ. देशपांडे यांनी केले. कार्यक्रमाचे प्रास्तविक व पाहुण्यांचे स्वागत इन्चार्ज प्रा. गुलाब गायकवाड , सूत्रसंचालन प्रा. रूपाली देशमुख , तर आभार प्रा. स्वप्निल शिंदे यांनी मानले. या कार्यक्रमासाठी प्रा. भाऊसाहेब मांढरे प्रा. अमोल टेमक श्री संतोष धुळे , श्रीमती मनीषा खाटेकर आदींसह पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!