खरशिंदे येथे मोफत नेत्ररोग शिबिर संपन्न
खरशिंदे / लोकवेध live न्यूज / भैय्या इनामदार
संगमनेर तालुक्यातील ग्रामीण भागात असलेले खरेशिंदे या ठिकाणी सामाजिक कार्यकर्ते भैया इनामदार व मोसिन शेख यांच्यावतीने नेत्ररोग शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या शिबिरासाठी आश्वी येथील अतिशय हुशार परिसर व तालुक्यात नावलौकिक असलेले सुप्रसिद्ध नेत्ररोग तज्ञ डॉ अभिजीत गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ स्मिता अभिजीत गायकवाड यांनी येथील ग्रामस्थांची मोफत नेत्ररोग तपासणी केली ग्रामपंचायत मध्ये शिबिराचे नियोजन केले होते खरशिंदेच्या चे सरपंच सौ सविता वाडेकर यांच्या हस्ते शिबिराचे उद्घाटन करण्यात आले यावेळी उपसरपंच अशोक बर्डे, यांनी मोलाचे सहकार्य केले या शिबिरामध्ये 80 ते 90 लोकांचे डोळ्यांची तपासणी अगदी मोफत करण्यात आली यावेळी या शिबिरामध्ये नऊ ते दहा लोकांना मोतीबिंदू असल्याचे आढळून आले तसेच काहींना पडद्यांच्या समस्या जाणवल्या तर इतर लोकांना डोळ्यांचे नंबर लागले असल्याचे सांगितले . यावेळी सामाजिक कार्यकर्ते भैया इनामदार मोसिम शेख यांनी डॉक्टर अभिजीत गायकवाड यांच्याशी चर्चा केली
अभिजीत डॉक्टर म्हणाले की खरशिंदे हे गाव अतिशय ग्रामीण भागात असल्यामुळे येथील लोकांना रोजगारासाठी बाहेरगावी जावे लागते त्यामुळे काही ग्रामस्थ नेत्र तपासणी पासून वंचित आहे राहिले असतील त्यांच्यासाठी पुढील महिन्याच्या दहा तारखेला शिबिराच्या आयोजन करून आपण पुन्हा नेत्ररोग तपासणी अगदी मोफत करू व येथील जे लोक शस्त्रक्रियेसाठी येणार आहे त्यांना अगदी अल्प दरात शस्त्रक्रिया करणार आहे यासाठी विशेष सहकार्य येथील ग्रामस्थ संजय गायकवाड, ग्रामसेवक कराळेसाहेब, मच्छिंद्र वाडेकर, सत्यजित वाडेकर व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते या शिबिरासाठी सरपंच सौ. सविता वाडेकर यांनी डॉक्टरांचे आभार मानले
