अहमदनगर येथे महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीमार्फत कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिर

निमगाव जाळी / लोकवेध live न्यूज /अशोक गोसावी

 

शनिवार दि.29 जुलै व रविवार दि.30 जुलै 2023 रोजी स्नेहालय, एमआयडीसी, अहमदनगर येथे नगर जिल्ह्यासाठी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती मार्फत कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिर आयोजित करण्यात आले आहे. हे शिबिर दोन दिवसांचे असल्याने दुरून येणाऱ्या कार्यकर्त्यांसाठी मुक्कामाची सोय करण्यात आली आहे. या दोन दिवशीय कार्यशाळेत राज्य कार्यकारिणी सदस्य उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत. शनिवार दिनांक 29 जुलै रोजी सकाळी दहा वाजता मान.अरुण कडू पाटील यांचे अध्यक्षतेखाली डॉ.गिरीश कुलकर्णी यांचे हस्ते उद्घाटन होणार असून ॲड.श्याम असावा मार्गदर्शक म्हणून उपस्थित राहणार आहेत.

दोन दिवसाच्या या कार्यशाळेत वैज्ञानिक दृष्टिकोन, चमत्कारामधील विज्ञान, श्रद्धा अंधश्रद्धा, जादूटोणाविरोधी कायदा , मन मनाचे आजार, भूत बाधा, करणी ,भानामती , स्त्रिया आणि अंधश्रद्धा, संत आणि समाजसुधारकांचे अंधश्रद्धा निर्मूलन विषयक योगदान, फल ज्योतिष थोतांड आणि खगोलशास्त्र, बुवाबाजी विरोधी वैचारिक भूमिका आदी विषयांवर मार्गदर्शन केले जाणार आहे.
राज्य कार्यकारिणी सदस्य डॉ.हमीद दाभोळकर , प्रशांत पोतदार, नंदिनी जाधव, प्राध्यापक रमेश माने, हेमंत धानोरकर हे मार्गदर्शन करणार आहेत.
सामाजिक कार्याची आवड असणारे व अंधश्रद्धा निर्मूलन चळवळीत कार्य करू इच्छिणाऱ्या व्यक्तींनी या शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन अध्यक्ष अरुण कडू पाटील, कार्याध्यक्ष मधुकर अनाप, डॉ. संजय लड्ढा, महेश धनवटे , रवी सातपुतेआदींनी केले आहे.
अधिक माहितीसाठी खालील नंबर वर संपर्क साधावा.
मधुकर अनाप… 98 50 14 47 09
डॉ. संजय लड्डा….98 22 52 64 64
महेश धनवटे… 93 26 09 75 80
रवी सातपुते…..93 71 14 09 12

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!