अण्णाभाऊ साठेंची ओळख नव्या पिढीला होणे गरजेचे – वाकचौरे सर
पिंपरणेत अण्णाभाऊ साठे जयंती उत्साहात साजरी
पिंपरणे / लोकवेध live न्यूज
शिक्षणाच्या कुठल्याही विद्यापीठात न जाता स्वयम् साक्षर झालेल्या लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी जीवनाच्या शाळेतच अभ्यास केला आणि थोर साहित्य संपदा निर्माण केली अशा थोर साहित्यिकाची व त्यांच्या साहित्याची जागतिक पातळीवर दखल घेतली गेली परंतु त्याची ओळख व त्यांचे साहित्य सर्वांसमोर फार कमी आले आहे हे दुर्दैव गोष्ट आहे त्यामुळे सर्व समाजातील साक्षर यांनी व तरुण पिढी नि साहित्यप्रेमींनी लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांची ओळख संपूर्ण जगाला करण्यासाठी प्रयत्न करावे असे आवाहन अण्णासाहेब वाकचौरे सर यांनी केले आहे
बहुजनांच्या वेदनांना साहित्यातून वाचा फोडणारे आणि कष्टकऱ्यांच्या हक्कांसाठी झगडणारे लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांची जयंती संगमनेर तालुक्यातील पिंपरणे येथे लहुजी वस्ताद युवा मंच पिंपरणे ग्रामपंचायत, गगनगिरी महाराज विद्यालय, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, विविध राजकीय पक्ष, संस्था-संघटनांच्या वतीने मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी सरपंच नारायण मरभळ यांच्या शुभहस्ते अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला यावेळी दिनकरराव वाकचौरे, कैलास काळे, शिवराम वाकचौरे, अरुणसाहेब देशमुख, अण्णासाहेब वाकचौरे सर, अजित देशमुख, गंगाराम वाकचौरे, मंजाबापू साळवे, पोलीस पाटील विनोद साळवे, राहुल बागुल, निलेश बागुल, उत्तमनाना राहिंज, सुरेश ठोंबरे, बाळासाहेब कर्पे, बाळासाहेब निकम ,आनंदा साळवे, पोपट साळवे, प्रकाश साळवे, रामनाथ ठोंबरे, बाळासाहेब साळवे, साहेबराव बागुल, संदीप साळवे, राहुल साळवे आदी उपस्थित होते याप्रसंगी मान्यवरांकडून अण्णाभाऊ साठे यांच्या जीवनावर प्रकाश टाकण्यात आला या प्रसंगी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ग्रामपंचायत कर्मचारी नितीन बागुल, सुरेश साळवे, प्रदीप मांडे ,लहुजी वस्ताद युवा मंचच्या कार्यकर्त्यांनी अतिशय मोलाचे परिश्रम घेतले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक मंजबापु साळवे यांनी केले तर आभार पोलीस पाटील विनोद साळवे यांनी मानले
