लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची 103 वी जयंती संपन्न.

 

माढा तालुका / लोक वेध live न्यूज / हनुमंत मस्तुद

परंडा शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये 103 वी जयंती संपन्न करण्यात आली. त्यावेळी परंडा पंचायत समितीचे Bdo संतोष नागटिळक यांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करून पुष्पगुच्छ अर्पण करून कार्यक्रम सुरुवात करण्यात आली . यावेळी कार्यक्रमास आलेल्या मान्यवरांना पुष्पगुच्छ व गोरख मोरजकर लिखित पुस्तिका चे वाटप करण्यात आले . आणि परंडा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अमोद भुजबळ व स्टेट बँक ऑफ इंडिया चे व्यवस्थापक निलेश बोंबले आणि नवनाथ कसबे यांच्या हस्ते परंडा शहरातील गुणवंत व निराधार मुलांना शाॕक वही पेन शाळेची पाटी पेन्सिलचा बॉक्स शालेय साहित्य वाटून जयंती साजरी करण्यात आली. यावेळी परंडा शहराचे माजी नगराध्यक्ष नसीर बर्फी वाले, मनसेचे जिल्हाध्यक्ष आबासाहेब ढवळे, तालुका अध्यक्ष सुरेश पाटील, धनंजय सोनटक्के, मोहनदादा बनसोडे, किरण बनसोडे , तानाजी शिंदे परंडा शहरातील पत्रकार बांधव व तुकाराम गंगावणे, नवनाथ कसबे, आप्पा बनसोडे , अनिल दनाने , आनंद हेळकर, भीमराव शिंदे , सुनील दनाने, अभय कुलकर्णी , राहुल बनसोडे , दीपक चव्हाण , विशाल बनसोडे , सोमनाथ कसबे इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!