अकोले तालुक्यातील दुर्गम वरखडवाडी , देवठाण येथे विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप
अकोले / लोकवेध live न्यूज
“संत गाडगेबाबा भानुप्रभाकार सेवा प्रतिष्ठान” संगमनेर ,तर्फे वरखडवाडी येथील जिल्हा परिषदेच्या इयत्ता आठवीच्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती परीक्षा मार्गदर्शक संच व लेखन साहित्य नुकतेच वाटप करण्यात आले.
अध्यक्षस्थानी संत गाडगेबाबा भानू प्रभाकार संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्रा. चं. का. देशमुख होते.प्रा.देशमुख यांनी विद्यार्थ्यांना उपदेश करताना सांगितले की आजचा अभ्यास आजच करा, मिळालेले ज्ञान मुरवा, चिंतन करा, खूप मोठे व्हा.. असा संदेश दिला.
यावर्षी संस्थेतर्फे 23 विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती परीक्षा मार्गदर्शक पुस्तके, वह्या, पेन, पेन्सिल आदी साहित्य देण्यात आले. आजचा संस्थेतर्फे हा 180 वा कार्यक्रम संपन्न झाला.
प्रा.चं. का. देशमुख हे सेवानिवृत्त प्राध्यापक आहेत. आपल्या मिळालेल्या रकमेच्या ठेवी ठेवून त्यावर मिळणाऱ्या व्याजातून संस्थेचे मुलांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी, उपेक्षित घटकांसाठी व गुणवंतांसाठी संस्था नेहमी सहकार्य करत असते.
यावेळी संस्थेचे रुपेश आभाळे,शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष संजय दराडे , शाळेचे मुख्याध्यापक सुखदेव गोंदके सर, शिक्षिका रुपाली कुलकर्णी मॅडम व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सूत्रसंचालन भानुदास झंजाड यांनी केले, तर प्रमोद विसाळ यांनी आभार मानले.
