रयत शैक्षणिक संकुल सात्रळचे शिष्यवृत्ती परीक्षेत सुयश

 

निमगाव जाळी / लोक वेध live न्यूज / अशोक गोसावी 

 

रयत शिक्षण संस्थेच्या नानासाहेब सहादू कडू पाटील विद्यालय, सात्रळने पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत नेत्रदीपक यश संपादन केले आहे.
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत घेतल्या जाणाऱ्या या शिष्यवृत्ती परीक्षेत इयत्ता आठवीचे विद्यार्थी प्रविष्ट होतात. सन २०२२-२३ या शैक्षणिक वर्षात इयत्ता आठवीचे विद्यालयातील २४ विद्यार्थी बसले होते.त्यापैकी ५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून २ विद्यार्थी शिष्यवृत्तीधारक ठरले आहे.त्यामध्ये गागरे सार्थक अशोक,भाले सुजल स्वप्निल यांचा समावेश आहे.
त्याचप्रमाणे एन.एम.एम.एस स्पर्धा परीक्षेत विद्यालयाचे ६ विद्यार्थी सारथीसाठी शिष्यवृत्तीधारक ठरले असून यात शिंदे सार्थक प्रकाश,दिघे आदित्य शरद,कडू प्रथमेश विवेक,डुक्रे धनंजय अविनाश, घागरे सार्थक अशोक,गागरे समर्थ रावसाहेब या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती विभाग प्रमुख विलास गभाले, एन.एम.एम.एसचे विभागप्रमुख संजय दिघे, प्रकाश कुलथे, सचिदानंद झावरे, वैभव वसावे,भारत कोहकडे ,युनुस पठाण, प्राजंली फरकाडे आदिनी मार्गदर्शन केले.
सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे व मार्गदर्शक शिक्षकांचे रयत शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष अरुण कडू पाटील, उत्तर विभागाचे विभागीय अधिकारी तुकाराम कन्हेरकर, सहाय्यक अधिकारी काकासाहेब वाळुंजकर, शिवाजी तापकीर, ॲड विजयराव कडू पाटील, बबनराव कडू, संभाजीराव चोरमुंगे, भास्करराव फणसे, पत्रकार किशोर भांड,के.के.बोरा, युवानेते किरण कडू, पंकज कडू , विक्रांत कडू,गणेश कडू, प्राचार्या एस.आर.थोरात मॅडम, प्रभारी पर्यवेक्षक त्रिंबक राशिनकर भाऊसाहेब पेटकर, सर्व स्कूल कमिटी सदस्य, ग्रामस्थ व पालक आणि शिक्षणप्रेमी यांनी अभिनंदन केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!