अहमदनगर प्राथमिक शिक्षक बँकेच्या वतीने पिंपरणे केंद्र शाळेला इंटरएक्टिव बोर्ड भेट
पिंपरणे / लोकवेध live न्यूज
अहमदनगर जिल्हा प्राथमिक शिक्षक बँकेच्या वतीने अहमदनगर जिल्ह्यातील चौदा तालुक्यातील प्रत्येकी 2 शाळांना इंटरएक्टिव बोर्ड वाटप करण्यात आले. यावेळी संगमनेर तालुक्यातील जि.प.प्राथ,केंद्रशाळा,पिंपरणे व जि.प.प्राथ,शाळा , झरेकाठी यांना इंटरएक्टिव बोर्ड प्रदान करताना अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी सन्माननीय श्री.संभाजी लांगोरे साहेब व प्राथमिक शिक्षणाधिकारी सन्माननीय श्री.भास्करराव पाटील साहेब,गुरूमाऊली मंडळाचे अध्यक्ष सन्माननीय श्री.बापूसाहेब तांबे सर , बँकेचे चेअरमन श्री.डॉ.संदिपजी मोटे सर, व्हा.चेअरमन श्री.कैलास सारोक्ते सर तसेच संगमनेरचे विद्यमान संचालक श्री. भाऊराव राहिंज सर व श्री.कैलास सहाणे सर,तसेच बँकेचे विद्यमान संचालक व पदाधिकारी यांच्या उपस्थितीत इंटरएक्टिव बोर्ड स्वीकारताना जिल्हा परिषद प्राथमिक केंद्रशाळा, पिंपरणे चे ग्रेड पात्र मुख्याध्यापक तथा पिंपरणे केंद्राचे प्रभारी केंद्रप्रमुख श्री. संजय उत्तम बोर्से सर व उपाध्यापक श्री. प्रदिप बागुल सर उपस्थित होते. यावेळी श्री. संदिप गुंड सर यांचेवतीने इंटरएक्टिव बोर्ड वापरा संबंधी प्रशिक्षण देण्यात आले.पिंपरणे शाळेच्या वतीने मंदाकिनी मोदड,सुनिता अस्वले,प्रतिभा दुर्गुडे,मंदादेवी गवारी ,अनिता मुरडनर, श्री.प्रदिप बागुल व पालक यांनी प्राथमिक शिक्षक बँकेचे जाहिर आभार मानले
