रस्त्याच्या निकृष्ट कामाची चौकशी करावी – सरपंच नारायण मरभळ

पिंपरणे लोकवेध live न्यूज 

संगमनेर तालुक्यातील पिंपरणे हद्दीतील कोळवाडे चौफुली ते वाकचौरे, मरभळ वस्ती रस्त्याचे खडीकरण व डांबरीकरणाचे आणि रुंदिकरणाचे काम सुरू असणारे काम निकृष्ट दर्जाचे होत असल्याचा आरोप करून या कामाची चौकशी व्हावी असे येथील ग्रामस्थांचे म्हणणे आहे तरी संबंधित विभागाचे अधिकारी जोपर्यंत काम सुरू असलेल्या ठिकाणी कामाची पाहणी करून झालेल्या कामाचा दर्जा तपासण्यासाठी येत नाहीत व संबंधित ठेकेदारास ठोस सूचना करत नाहीत व अंदाज पत्रकानुसार काम होत नाही तोपर्यंत काम बंद ठेवण्यात येणार असल्याचा इशाराही सरपंच मरभळ व ग्रामस्थांनी दिला आहे दिला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी, गेल्या काही दिवसांपासुन कोळवाडे चौफुली ते वाकचौरे, मरभळ वस्ती रस्त्याचे खडीकरण व डांबरीकरणाचे आणि रुंदिकरणाचे काम सुरू झाले आहे. परंतू या रस्त्याच्या खडीकरणावेळी रस्त्यावर टाकण्यात येणारे खडीचे प्रमाण खूपच कमी असल्याचे तसेच या रस्त्यावर पुर्वी असणारे खड्डे व्यवस्थित न भरता तसेच जुने डांबर न काढता ते तसेच ठेवून फक्त त्याच्या साईड पट्ट्या भरून काम पुढे सुरू ठेवले आहे साईड पट्ट्या सुद्धा पूर्ण भरलेल्या नाहीत वास्तविक जुने डांबर काढून तेथे नवीन खडीकरण केले पाहिजे असे न करता ठेकेदाराने रस्त्याचे काम चालू ठेवले आहे तसेच खडीकरणाचा पहिला लीयर अतिशय नित्कृष्ट दर्जाचा टाकला गेला आहे खडीकरण झाल्यानंतर दोनच दिवसात त्या रस्त्यावर खड्डेच खड्डे आणि जिकडे तिकडे खडी पसरलेली असल्यामुळे या एक किलोमीटरच्या अंतरात गाडी चालवत असताना चालकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे तर काहीजण खडीवरून गाडी घसरून पडल्याचेही निदर्शनात आले आहे अशा नित्कृष्ट दर्जाच्या कामामुळे सदर रस्ता एक वर्षसुद्धा टिकणार नसल्याचा आरोप स्थानिक ग्रामस्थांनी केला. त्यामुळे संबंधित कामाची योग्य तपासणी केल्याशिवाय हे काम सुरु केले जाणार नाही, असा इशाराही ग्रामस्थांनी दिला आहे

चौकट ….
सदर काम हे अंदाज पत्रकानुसार होत नसून हा रस्ता कोळवाडे अंभोरे पिंपरणे जाखुरी, संगमनेर या गावांना जोडणारा महत्त्वपूर्ण आहे शाळेतील शाळेतील मुलांना पावसाळ्यात रस्ता खराब असल्यामुळे येणे जाण्यास त्रास होत असतो त्यासाठी या रस्त्याचे काम चांगले होणे गरजेचे आहे सदर कामाचा ठेकेदार रस्त्याच्या रुंदीकरणात तसेच कामात हलगर्जीपणा करत असल्याचे निदर्शनास आले आहे सदर काम चांगले झाले नाही तर यानंतर आम्ही तहसील कार्यालयासमोर उपोषण करू

नारायण मरभळ
सरपंच ग्रामपंचायत पिंपरणे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!