पिंपरणे शाळेत उगवणार विविध प्रकारचे आयुर्वेदिक व शोभेची झाड
“मिशन आपुलकी “अंतर्गत शिक्षकांनी शाळेस दिली २१ हजार रुपयांचे विविध प्रकारचे आयुर्वेदिक व शोभेची झाडे
संगमनेर / लोक वेध live न्यूज
संगमनेर तालुक्यातील पिंपरणे येथील जिल्हा परिषद केंद्र शाळेचे मुख्याध्यापक श्री.संजय उत्तम बोर्से सर यांच्या संकल्पनेतून शिक्षकांच्या सहकार्यातून “मिशन आपुलकी ” हा उपक्रम गेल्या अनेक वर्षापासून सुरू केला आहे या उपक्रमातून शाळेसाठी विविध निधी आणणे लोकसहभागातून शाळेसाठी वस्तू स्वरूपात रोख रकमेच्या स्वरूपात सहकार्य तसेच शिक्षकांच्या मदतीने शाळा विकासात विविध उपक्रम राबविणे या उद्देशाने हा प्रकल्प सुरू केला असून
मिशन आपुलकी याच प्रकल्पांतर्गत
मुख्याध्यापक श्री. बोर्से सर यांनी शाळेत वृक्षारोपण करण्याची शिक्षकांसमोर संकल्पना मांडली.
सर्व शिक्षकांनी एकत्र येत एकवीस हजार रुपये जमा केले त्यातून विविध प्रकारची १०१ झाडे आणून वृक्षारोपण केले.
यावेळी मुख्याध्यापक संजय बोर्से.प्रदिप बागुल.मंदाकिनी मोदड.सुनीता अस्वले.प्रतिभा दुर्गुडे.मंदादेवी गवारी,अनिता मुरडनर.आदी उपस्थित होते
“मिशन आपुलकी” अतंर्गत मागील वर्षी व आत्ताही पालकांकडून देणगी, वर्ग व शाळा स्तरावर घेण्यात आल्या. त्यातून भिंती चित्र रंगविल्या, कॉम्प्युटर घेतले ,बोलक्या भिंती, प्रकल्प वर्ग डिजिटल केले
शाळेत वृक्षारोपण तर करणे गरजेचे होते .
मुख्याध्यापकांनी आपले म्हणणे शिक्षकांसमोर मांडले आणि सर्व शिक्षकांनी क्षणाचाही विलंब न लावता स्वत: झाडे विकत घेण्याची व ती लावण्याची जबाबदारी स्विकारली.
मग कोणती झाडे घ्यायची येथपासून नियोजन करण्यात आले.यात मोठी झाडे फायकस , रबर ट्री, पाम, निंबो प्रोटीन, गोल्डन मोरपंखी तसेच काही आयुर्वेदिक रोपे. फळांची झाडे निवडण्यात आली.
दोन दिवसात ही झाडे आणून शाळा परिसरात वृक्षारोपण करण्यात आले
यात शाळेतील विद्यार्थ्यांनीही सहभाग घेतला.
शाळेच्या वैभवात झाडांच्या स्वरूपात हातभार लावल्याबद्दल मुख्याध्यापकांकडून सर्व शिक्षकवृंदांचे मनापासून आभार मानण्यात आले.
