रयत संकुल, सात्रळच्या विद्यार्थ्यांनी प्रतिनिधी निवडणुकी द्वारे घडविले ख-या लोकशाहीचे दर्शन

 

निवडणुकीत प्रथमच मोबाईल ई.व्ही.एम चा वापर

 

निमगाव जाळी / लोकवेध live न्यूज / अशोक गोसावी

 

रयत शिक्षण संस्थेचे, नानासाहेब सहादू कडू पाटील विद्यालय,सात्रळ ता.राहुरी येथील विद्यार्थ्यांच्या शालेय वर्ग मंत्रिमंडळाच्या निवडणूका २०२३-२४ च्या नियोजना नुसार नुकत्याच पार पडल्या, नियमानुसार इच्छुक विद्यार्थ्यांनीअर्ज भरले,प्रचार यंत्रणा राबविली, विशेष म्हणजे मोबाईल इ.व्ही.एम मशिनद्वारे मतदानही पार पडले.विद्यालयामध्ये विद्यार्थी प्रतिनिधी पदासाठी झालेल्या या निवडणुक प्रक्रियेतून विद्यार्थ्यांनी ख-या लोकशाहीचे दर्शन घडविले.
खरं तर ही निवडणूक देशाच्या या भावी नागरिकांसाठी प्रेरणादायी ठरेल अशी यंत्रणा या लहान मुलांनी राबवली होती. या उपक्रमास विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
या निवडणुकीचे खास वैशिष्ट्ये म्हणजे विद्यार्थ्यांनी तयार केलेले हुबेहूब मतदान कक्ष,तसेच वर्गशिक्षकांनी आपल्या मोबाईलवर तयार केलेले इ.व्ही.एम मशिन, मतदान अधिकारी, पोलीस कर्मचारी अशी ही प्रक्रिया पार पाडताना,सर्व मान्यवरांनी विद्यालयातील विद्यार्थ्यांचे कौतुक केले.
निवडणूक प्रक्रिया पार पाडण्यासाठी प्रभारी प्राचार्या सुशिलाताई थोरात, प्रभारी पर्यवेक्षक त्रिंबकराव राशिनकर,ज्युनिअर विभागाचे प्रमुख विलास दिघे,यांच्या मार्गदर्शनाखाली विभागप्रमुख विलास गभाले,सहाय्यक प्रमुख प्रकाश कुलथे, गुरुकुलप्रमुख सच्चिदानंद झावरे,जेष्ठ शिक्षिका संगिता सांगळे यांनी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम पाहिले,तर जेष्ठ शिक्षक केशव मुसमाडे, युनुस पठाण,भारत कोहकडे, संजय दिघे, वैभव वसावे, सतिश नालकर, ज्ञानदेव लेंडे, देविदास थोरात, शिवदास सातपुते, सुदर्शन गिते, सुनिता ढोकणे, गिताजंली गोसावी, प्रांजली फरकाडे, पल्लवी गावडे,प्रविणाताई दिघे कावेरी वदक,सुमेष शिंदे यांनी मतदान अधिकारी म्हणून काम पाहिले.
या निवडणुकीत इ.५ वी अ चा सार्थक जयराम कडू,इ.५ वी ब चा चैतन्य काकासाहेब सिनारे,६ वी अ चा साई गणेश साबळे,६ वी ब चा यश राहुल सिनारे,इ.७ वी अ चा वेदांत सिताराम धनवट,इ.७ वी ब चा साई रामदास पर्वत,इ.८ वी अ चा आशिष जयराम कडू,इ.८ वी ब चा साई मधुकर गागरे,इ.८वी क चा अथर्व भवार,इ.९ वी अ चा ओंकार पठारे,इ.९ वी ब चा कुणाल रविंद्र बलसाने,इ.९ वी क चा प्रणव सुनिल पलघडमल,इ.१० वी अ चा ओम अनाप,इ.१० वी ब चा सार्थक नानासाहेब लोंढे,इ.१० वी क चा अल्तमश पिंजारी या उमेदवारांचा विजय झाला.
या उपक्रमाची पाहणी करण्यासाठी पुण्यनगरी चे पत्रकार समर्थ वाकचौरे, पुढारीचे भगवान लांडे,जय बाबाचे अनिल वाकचौरे, लोकमत व राष्ट्रसह्याद्रीचे अशोकराव गोसावी,दिव्य मराठीचे नितीन सात्रळकर शकुरभाई तांबोळी यांनी उपस्थित राहून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
या उपक्रमाचे जिल्हा परिषद अहमदनगरचे माजी अध्यक्ष व रयत शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष अरुण कडू पाटील,विभागीय अधिकारी तुकाराम कन्हेरकर साहेब सहाय्यक अधिकारी काकासाहेब वाळुंजकर साहेब, शिवाजीराव तापकीर, प्रगती पतसंस्थेचे चेअरमन ॲड विजयराव कडू पा.संभाजीराव चोरमुंगे, बबनराव कडू, पत्रकार किशोर भांड, माजी सरपंच भास्करराव फणसे,‌ डॉ.के.के.बोरा, युवा नेते किरण कडू पा.पंकज कडू पा. माजी सरपंच गणेश पा.कडू,विक्रांत कडू भाऊसाहेब पेटकर आदिनी कौतुक केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!