सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात जन्मशताब्दी वर्ष लोगोचे अनावरण

सहकार, कृषी व शैक्षणिक उपक्रम राबविण्यात

संगमनेर / लोक वेध live न्यूज 

सहकारातील दीपस्तंभ थोर स्वातंत्र्य सेनानी सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात यांच्या जयंती शताब्दी निमित्त वर्षभरात सहकार, कृषी व शैक्षणिक क्रांतीचा महोत्सव साजरा होणार असून या निमित्त विविध उपक्रम राबविण्यात येणार आहे. यासाठी शताब्दी महोत्सवाचा लोगोचे अनावरण करण्यात आले आहे.

सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याच्या अतिथीगृहावर काँग्रेस पक्षाचे नेते आमदार बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते या लोगोचे अनावरण करण्यात आले .यावेळी माजी आमदार डॉ सुधीर तांबे, नगराध्यक्ष सौ दुर्गाताई तांबे, ज्येष्ठ नेते बाजीराव पा खेमनर, शंकर पा.खेमनर,कॅन्सरतज्ञ डॉ जयश्रीताई थोरात, रामहरी कातोरे,मिलिंद कानवडे,सोमेश्वर दिवटे, नवनाथ आरगडे,अजय फटांगरे ,आर.बी राहणे ,निखिल पापडेजा,सौ.अर्चना बालोडे, सौ.सुनंदाताई जोरवेकर, सौ निर्मलाताई गुंजाळ, संतोष हासे सुधाकर जोशी राजेंद्र चकोर कार्यकारी संचालक जगन्नाथ घुगरकर,अनिल शिंदे, बाबुराव गवांदे यांचे सह अमृत उद्योग समूहातील व संगमनेर तालुक्यातील विविध संस्थांचे पदाधिकारी व युवक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

याप्रसंगी बोलताना आमदार थोरात म्हणाले की ,सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात यांनी सहकार हा आपल्या जीवनाचा मार्ग निवडताना संगमनेर तालुक्याच्या ग्रामीण विकासाचा पाया घातला. सहकारी चळवळीसाठी त्यांनी दिलेली तत्वे देशाला मार्गदर्शक असून त्यांच्या जन्मशताब्दी निमित्त कृषी, सहकार, शिक्षण ,समाजकारण या विविध क्षेत्रात उपक्रम राबवले जाणार आहे .यामध्ये विविध व्याख्याने, सेमिनार, नवनवीन तज्ञांचे मार्गदर्शन, सांस्कृतिक कार्यक्रम अशा विविध कार्यक्रमांचा समावेश असेल.शेती व सहकारात काम करताना भाऊसाहेब थोरात यांनी साहित्य संस्कृती ही जपली आहे. विचारांशी एकनिष्ठता या त्यांच्या तत्त्वांवर आपले तालुक्याचे राजकारण सुरू असल्याचे ते म्हणाले.

तर आमदार डॉ तांबे म्हणाले की भाऊसाहेब थोरात यांनी सहकारातून तालुक्यात समृद्धी निर्माण केली. संगमनेर तालुका शिक्षण, समाजकारण, आरोग्य ग्रामीण विकास यामध्ये पुढे आहे. यामुळे प्रत्येकाच्या जीवनात क्रांती निर्माण झाली असून स्वर्गीय भाऊसाहेब थोरात यांच्या प्रति प्रत्येकाच्या मनात कृतज्ञता आहे. हे वर्ष जन्मशताब्दी वर्ष असून या निमित्त विविध उपक्रम राबवण्यात येणार आहेत.

तर सौ.दुर्गाताई तांबे म्हणाल्या की, सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात यांनी वयाच्या अवघ्या १८ व्या वर्षी स्वातंत्र्यसंग्रामात स्वतःला झोकून दिले स्वातंत्र्यप्राप्तीनंतर त्यांनी ग्रामीन विकासासाठी सहकाराचा मार्ग निवडला. वयाच्या 84 व्या वर्षी पर्यावरण संवर्धनासाठी चे दंडकारण्य अभियान आपल्या सर्वांना दिले. तालुक्यातील प्रत्येकाच्या जीवनात परिवर्तन घडवणाऱ्या स्वर्गीय भाऊसाहेब थोरात यांच्या जन्मशताब्दी निमित्त विविध कार्यक्रमांमधून आपल्या सर्वांना नक्कीच प्रेरणा मिळणार आहे.

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक कॅन्सर तज्ञ डॉ. जयश्रीताई थोरात यांनी केले तर कार्यकारी संचालक जगन्नाथ घुगरकर यांनी आभार मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!