भाजपच्या उत्तर महाराष्ट्राच्या आयटी सेलच्या सहसंयोजक पदी विक्रमसिंह खताळ पाटील यांची नियुक्ती

संगमनेर / लोकवेध live न्यूज 

 

संगमनेर तालुक्याचे युवा नेते आदरणीय विक्रमसिंह खताळ पाटील दादांची भारतीय जनता पक्षाच्या उत्तर महाराष्ट्राच्या आय. टी. सेल विभागाच्या सह-संयोजक पदी नियुक्ती होताच पिंपरणे येथे फटाके फोडून जल्लोषात स्वागत करण्यात आले!
मा मंत्री व संगमनेर तालुक्याचे भाग्यविधाते स्व बॅरिस्टर बि जे खताळ पाटील साहेबांचे नातू संगमनेर तालुक्याचे युवा नेते आदरणीय विक्रमसिंह खताळ पाटील दादांच्या कामगिरीची दखल घेत पक्षश्रेष्ठींकङून त्यांची भारतीय जनता पक्षाच्या उत्तर महाराष्ट्राच्या आय टी सेल विभागाच्या सह-संयोजक पदी निवड करण्यात आली! या निवङीचे वृत्त कळताच तालुक्यातील पिंपरणे येथे विक्रमसिंह खताळ पाटील दादांचे खंदे समर्थक शुभम देशमुख यांनी संध्याकाळी फटाके फोडून जल्लोष साजरा केला! यावेळी शुभम देशमुख म्हणाले अहमदनगर जिल्ह्यासाठी खताळ पाटील परिवाराचे योगदान कधीही विसरता न येण्यासारखे आहे!स्व मा मंत्री बॅरिस्टर बि जे खताळ पाटील साहेबांच्या पावलांवर पाउल ठेवून विक्रम दादा काम करत आहेत!विक्रमसिंह खताळ पाटील दादांच्या रूपाने उत्तर महाराष्ट्राला नवीन नेता मिळाला! गल्लीपासून दिल्लीपर्यंत ओळख असलेले ते एकमेव नेते आहेत व आपण सर्वांनी त्यांच्या पाठिशी प्रामाणिक राहिले पाहिजे असे प्रतिपादन शुभम देशमुख यांनी यावेळी केले! याप्रसंगी शुभम देशमुख, मा ग्रामपंचायत सदस्य दादाभाऊ गायकवाड,रविंद्र देशमुख, लहानू ठोंबरे, सुशांत बागूल, अमोल बागूल,राहुल राहिंज,ज्ञानेश्वर निकम,रमेश खंङागळे,ओम खंङागळे, निखिल पिंपळे आदि मान्यवर उपस्थित होते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!