सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात पर्यावरण संवर्धन पुरस्काराने राज्यातील 14 संस्थांचा सन्मान
दंडकारण्य अभियानालाही हा राज्यस्तरीय पुरस्कार
संगमनेर (प्रतिनिधी) लोकवेध live न्यूज
सजीवसृष्टीच्या रक्षणासाठी थोरस्वातंत्र्य सेनानी भाऊसाहेब थोरात यांनी वयाच्या 84 व्या वर्षी सुरु केलेले दंडकारण्य अभियान ही पर्यावरणाची मोठी लोकचळवळ ठरली असून सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात यांच्या नावाने राज्यस्तरीय पुरस्काराने पुणे येथे 14 संस्थांना गौरवण्यात आले असून दंडकारण्य अभियानाला हा पुरस्कार मिळाला आहे.
प्रा. बाबा खरात यांना सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात पर्यावरण संवर्धन पुरस्काराने गौरवण्यात आले आहे
दंडकारण्य अभियानाचे मुख्य समन्वयक बाळासाहेब उंबरकर यांना व या दंडकारांनी अभियानाच्या प्रचार प्रसार कार्याबद्दल आदिवासी सेवक प्रा. बाबा खरात यांना सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात पर्यावरण संवर्धन पुरस्काराने गौरवण्यात आले आहे
पुणे येथील आकाशवाणी सभागृह शिवाजीनगर येथे हरित मित्रपरिवार, गुरुकृपा संस्था, आकाशवाणी व दूरदर्शन केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात पर्यावरण संवर्धन पुरस्कार वितरण संपन्न झाले. यावेळी हरित मित्र संस्थेचे अध्यक्ष डॉ महेंद्र घागरे, प्रशांत थोरात, कोल्हापूर परिक्षेत्राचे आईची सुनील फुलारी, आकाशवाणीचे गडवाल ,आकाशवाणीचे उपसंचालक इंद्रजीत बागुल व अप्पर प्रधान मुख्य वनसंरक्षक विवेक खांडेकर आदी उपस्थित होते.
दंडकारण्य अभियानाचे प्रणेते स्वातंत्र्य सेनानी सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात यांनी पर्यावरण संवर्धनाकरता वयाच्या 84 व्या वर्षी दंडकारण्यअभियान ही लोक चळवळ सुरू केली. या अभियानातून संगमनेर तालुक्यात उघड्या बोडक्या डोंगरांवर 35 कोटी बियांचे रोपण झाले असून आज हा तालुका वनराईने फुलला आहे. आयुष्यभर समाजसेवा, सहकार आणि पर्यावरणासाठी काम करणाऱ्या स्वातंत्र्य सैनिक असलेल्या सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात यांच्या नावाने हरित मित्र पुणे या संस्थेने राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर केले आहेत .पर्यावरण आणि संवर्धन क्षेत्रात काम करणाऱ्या विविध 14 संस्थांना यावेळी सन्मान चिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले .

संगमनेर मधून दंडकारण्य अभियानाला हा पुरस्कार मिळाला असून प्रचार प्रसार कार्याबद्दल आदिवासी सेवक प्रा बाबा खरात यांना तर उत्कृष्ट समन्वयाबद्दल बाळासाहेब उंबरकर यांनाही या पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. पुणे येथे हा पुरस्कार प्रा बाबा खरात बाळासाहेब आंबेडकर व एस एम खेमनर यांनी स्वीकारला
या पुरस्काराबद्दल विधिमंडळ पक्षनेते आमदार बाळासाहेब थोरात ,आ.डॉ सुधीर तांबे, आमदार सत्यजित तांबे, सौ दुर्गाताई तांबे ,बाजीराव पा खेमनर , ॲड माधवराव कानवडे, इंद्रजीत भाऊ थोरात, कॅन्सर तज्ञ डॉ.जयश्रीताई थोरात ,बाबा ओहोळ ,रणजितसिंह देशमुख, सुधाकर जोशी ,संपतराव डोंगरे, शंकर पा. खेमनर, लक्ष्मणराव कुटे आदींसह विविध पदाधिकाऱ्यांनी अभिनंदन केले आहे.
