देशाच्या कानाकोपऱ्यात वारकरी संप्रदा याचे विचार पोहोचवा -सौ विखे
जाखुरीत गगनभरारी कृषीमहोत्सव शेत कऱ्यांसाठी झाला खुला
पिंपरणे / लोकवेध live न्यूज 
     महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे संतांनी तुम्हा आम्हाला जे विचार दिलेले आहे  ते विचार सर्वांच्या दृष्टीने खूप महत्त्वाचेआहे  संतांनी दिलेल्या विचारांची किंमत पैशांत कधी मोजता येत नाहीत म्हणून संतांनी दिलेले वारकरी संप्रदायाचे सर्व विचार देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचविण्या साठी सर्वांनी प्रयत्न करावे असे आवाहन जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षाशालिनी ताई विखे पाटील यांनी केले
        संगमनेर तालुक्यातील जाखुरी येथे सुरू असणाऱ्या स्वामीगगनगिरी महाराज अखंड हरिनाम सप्ताहात ऋषी संस्कृती बरोबर कृषी संस्कृतीचा मिलाप व्हावा या उद्देशाने  शेतकऱ्यांच्या दृष्टीने महत्त्वाच्या असणाऱ्या गगनभरारी कृषी महोत्सवाचा शुभारंभ जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष शालिनीताई विखे पद्मश्री पोपटराव पवार बीजमाता पद्मश्री राहीबाई पोपेरे आणि संगमनेर दूध संघाचे चेअरमन रणजितसिंह देशमुख यांच्या शुभहस्ते करण्यात आला त्यावेळी आयोजित कार्यक्रमात पद्मश्री पवार बोलत होते यावेळी व्यासपीठावर सप्ताह कमिटीचे अध्यक्ष दिलीपराव शिंदे संजय महाराज देशमुख वसंतराव देशमुख
आबासाहेब थोरात
कपिल पवार प्रमोद देशमुख सुदीप वाकळे सुभाष राहणे सागर वाकचौरे  ज्ञानेश्वर वाकचौरे अक्षय भालेराव  विवेक कासार किसनराव शिंदे
नानासाहेब कानवडे माजी सरपंच बाळासाहेब देशमुख नितीन पानसरे देशमुख माजी उपसरपंच किसन पानसरे राजेंद्र पानसरे कारभारी राहणे यांच्यासह पंच क्रोशीतील ग्रामस्थ उपस्थित होते
        सौ विखे म्हणाल्या की महाराष्ट्रात अनेक मोठमोठे संत होऊन गेले आहे त्या मुळे महाराष्ट्र ही खऱ्या अर्थाने संतांची भूमी म्हणून ओळखले जात आहे  त्याच महाराष्ट्रातील नगर जिल्ह्या तील नेवासा येथील संत ज्ञानेश्वर शिर्डीचा साईबाबा पुणतांबा येथील चांगदेव महाराज अशा अनेक थोर  संतांची पाऊले या जिल्ह्याला लागलेली आहेत महाराष्ट्रामध्ये नव्हे तर संपूर्ण देशातच सर्वात मोठा गंगागिरी महा राजांचा सप्ताह होत असतो त्यापाठोपाठ आता  गगनगिरी महाराजांचा सप्ताह होत आहे या दोन्ही सप्ताहाना तेवढेच महत्त्व प्राप्त झालेले आहे आमच्या सारख्या राज कारण्याची एखादी राजकीय सभाअसली तर आम्हाला गाडी पाठवून सुद्धा एवढ्या मोठ्या संख्येने लोक येत नसतात  मात्र संतांच्या विचारात एवढी ताकद आहे की आपोआप त्यांचे विचार ऐकण्यासाठी लोकांचे पाऊले सप्ताहांकडे वळत अस तात तुम्ही कितीही  शिक्षण घेऊन मोठे झाले आणि उच्च पदाला गेले तरी संतांचे आशीर्वाद  असल्याशिवाय आपण तग धरू शकत नाही  विखे पाटील परिवार जरी राजकारणात असला तरी तेवढेच महत्त्व समाजकारण आणि वारकरी संप्र दायाला सुद्धा देत असतो म्हणूनच नेवासा येथे वारकरी शिक्षण संस्थेसाठी स्वपद्मश्री बाळासाहेब विखे पा यांनी जागा दिली असल्याचे त्यांनी सांगितले
        महाराष्ट्र राज्य आदर्श गाव योजनेचे माजी कार्याध्यक्ष पद्मश्री पोपटराव पवार म्हणाले की शेतीमध्ये बेसुमार रासायनिक खताचा वापर केल्यामुळे मातीचे आरोग्य संपत चालले आहे शेतीला रासायनिक खताचा बेसुमार वापर केला असल्यामुळे त्या शेतीतून उगवलेले अन्न धान्य सुद्धा विषरूपातच तयार असते आपण सर्व जण अन्न धान्याच्या रूपाने विषच खात असतो  त्यामुळे मानवाला कॅन्सर सारखा रोग होऊ लागला आहे म्हणून उद्याच्या भविष्यकाळात आपल्या सर्वांना काळ्या मातीकडे आणि पाण्याकडे जास्त लक्ष देणे  गरजेचे आहे तुमचे आरोग्य चांगले नसेल तर तुम्हाला किती पैसा मिळाला तरी त्यास काहीही महत्त्व राहणार नाही त्यामुळे भविष्यात आपले आरोग्य चांगले ठेवायचे असेल तर प्रत्येकाने विषमुक्त व सेंद्रिय शेती करणे गरजेचे आहे गगनगिरी महाराजांच्या सप्ताहात गगनभरारी कृषी महोत्सव आयोजित केला आणि या कृषी महोत्सवामध्ये ऋषी व कृषी संस्कृतीचा मेळ घालत सर्वच ऑरगॅनिक देण्याचा प्रयत्न होत आहे परंतु कॅन्सर काही कमी होत नाही याची आपणाला दक्षता घेणे गरजेचं आहे गगनगिरी महाराज तासोन तास पाण्यामध्ये राहिले गगनबावड्या सारख्या जंगलात तपस्या केली म्हणून आपल्या मातीत ज्या प्रकारची ऊर्जा आहे ती सर्व ऊर्जा अध्यात्माची ऊर्जा आहे आणि वारकरी संप्रदायाने जी दिशा दिली ती खूप मोठी परंपरा आहे आज पाणी संपलं आणि माती संपले तरआपणकधी  संपू हे कोणीही सांगू शकत नसल्याचे सांगत ते म्हणाले की राज्यात गंगागिरी महाराज यांचा मोठा सप्ताह आणि आता त्यानंतर आता दुसरा सप्ताह परमपूज्य महानतपस्वी गगनगिरी महाराजांचा सप्ताह होत असल्याचे त्यांनी सांगितले
      पद्मश्री राहीबाई पोपेरे म्हणाल्या की  मी कुठली शाळा शिकले नाही तर फक्त शेती शाळा शिकली मी गावरान बियाणे जपले असून मी हळदी कुंकवाला महिलां कडे गेले तर वाण म्हणून गावरान बी भेट देत असते नुसते फोटो काढून शो करण्या पेक्षा आपण आपल्या शेतीत बदल कर ण्याचा विचार करा जुने ते सोने आहेअसे मानून जुन्याच स्वीकार करावा असे आवा हन करून शेतकऱ्यांनी आपल्या काळ्या मातीला जपत गावठी बियाणे जपा असा मोलाचा सल्ला देत त्या म्हणाल्या कीमला आत्तापर्यंत जे  पुरस्कार मिळालेले आहेते पुरस्कार माझे नव्हे तर माझ्या या काळ्या मातीचे आहे म्हणून या काळ्या  मातीला आपण सर्वांनी जपावे आणि  तिच्यातून विषाचे नव्हे तर विषमुक्त अन्न घ्या असा मोलाचा सल्ला त्यांनी शेतकऱ्यांना दिला
वृक्षाचे संवर्धन करा आणि शौचालय बांधा –   पवार 
       सप्ताह कमिटीच्या वतीने आलेल्या सर्व भाविक भक्तांना एक झाडाचे रोप भेट देणार आहे त्यांचे तुम्ही फोटो काढून ठेवा अन पुढील सप्तांहात तुम्हाला दिलेले झाड जगले की नाही याचा जाब विचारा  आणि प्रत्येक महिलेने आपल्या घरीशौचा लय असलेच पाहिजे नसेल तर मीप्रथम ते बांधील अशी गगनगिरी महाराजांच्या चरणी शपथ घ्या असाही मोलाचा संदेश आदर्श हिवरेबाजार गावचे माजी सरपंच व आदर्श गाव योजनेचे माजी कार्याध्यक्ष पद्मश्री पोपटराव पवार यांनी जाखुरी करांना दिला 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!