डिग्रस विद्यालयात स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा 

 

पिंपरणे / लोकवेध live न्यूज 

संगमनेर तालुक्यातील डिग्रस येथील सोमेश्वर सेवाभावी संस्थेच्या सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात विद्यालयात मंगळवार दिनांक 15 ऑगस्ट 2023 रोजी भारताचा 77 वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा झाला .
या कार्यक्रमाचे अध्यक्ष डिग्रस गावचे सुपुत्र कालीचरण पुरी मामा व प्रमुख अतिथी विद्यालयाचा माजी विद्यार्थी व कृषी क्षेत्रातील उद्योजक सुनील म्हतू पुणेकर , अटल भूजल योजना संगमनेरचे अधिकारी गणेश शिंदे , राजेंद्र शिंदे हे होते .
याप्रसंगी सोमेश्वर सेवाभावी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष महंत बुवाजी बाबा ,उपाध्यक्ष महंत उमाजी बाबा पुणेकर व संस्थेचे सचिव जानकीराम पुणेकर यांनी सर्व विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. कार्यक्रम प्रसंगी मोठ्या संख्येने विद्यार्थी, विद्यार्थ्यांची पालक व ग्रामस्थ हे उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक पांडुरंग बाचकर यांनी केले.विद्यालयाचे क्रीडा शिक्षक मच्छिंद्र खेमनर यांनी विद्यार्थ्यांकडून सोपान योगासने याद्वारे झेंड्याला मानवंदना दिली.
माझी मातृभूमी रडती आहे कारण आपण आपल्या मातृभूमीला आई मानतो. आणि त्याच भूमीवरती रासायनिक खतांसारखे विष टाकतो यामुळे आपल्या येणाऱ्या भविष्याला आपण अंधारात लोटतो आहोत असे प्रमुख पाहुणे व अटल भूजल योजना संगमनेरचे अधिकारी गणेश शिंदे यांनी आपलं मनोगत व्यक्त केला.15 ऑगस्ट निमित्ताने डिग्रस विद्यालयात अटल भूजल सर्वेक्षण अंतर्गत विविध उपक्रमाचा सहभाग.
मागील शैक्षणिक वर्षातील प्रत्येक इयत्तेत प्रथम , द्वितीय, तृतीय आलेल्या विद्यार्थ्यांचा व अटल भूजल योजना संगमनेर यांच्या अंतर्गत रांगोळी व चित्रकला स्पर्धा यांचे बक्षीस वितरणाचा कार्यक्रम झाला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यालयाचे शिक्षक विजय शेंगाळ यांनी केले.विद्यालयातील विद्यार्थ्यांनी स्वातंत्र्य दिना निमित्त भाषने केली. इयत्ता दहावीची विद्यार्थिनी हर्षदा भालेराव व किसन मदने यांनी केलेल्या उत्कृष्ट भाषणाबद्दल संस्थेचे सचिव जानकीराम बुवाजी पुणेकर व परसराम पुणेकर यांनी त्यांचा सन्मान केला.
डिग्रस गावचे युवा नेतृत्व श्री. सुरेश उदावंत ,श्री. कालीचरण पुरी ,श्री. पोपट राणूजी बिडगर , श्री. श्रीकांत नान्नार श्री. अशोक बिडगर, श्री. रवी पुणेकर व श्री.समीर पठाण यांनी विद्यार्थ्यांना 15 ऑगस्ट निमित्त विद्यार्थ्यांच्या जेवणाची व्यवस्था केली.
विद्यार्थ्यांनी अटल भूजल अंतर्गत चित्रकला प्रदर्शन व रांगोळी प्रदर्शन ग्रामस्थांनी पाहिले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विद्यालयाचे शिक्षक साहेबराव नेहे ,ज्योती चिंधे, मनीषा आचपळे , श्रीपाद पांढरे , बारकू पुणेकर ,आविळे मावशी यांनी परिश्रम घेतले.
विद्यालयाचे शिक्षक दिलीप दिवे यांनी सूत्रसंचालन केले व महेंद्र पुणेकर यांनी सर्वांचे आभार मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!