माया केअर सेंटर ची स्वातंत्र्य दिनानिमित्त एकोपा बैठक

नाशिक / लोक वेध live न्यूज / निलेश शेकोकार 

आज 15 ऑगस्ट रोजी स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून ज्या कार्यक्रमाचे नियोजन झाले ते सर्व स्वयंसेवकांच्या मदतीने खूपच छान रित्या पूर्ण झाले.
त्यामध्ये गायत्री लचके, शुभदा दाणी, अंजली गाडे, बापू तिवडे, निलेश शेकोकार , सतीश कुंभकर्ण इत्यादी स्वयंसेवकांनी भाग घेतला.
सर्व स्वयंसेवक महाराणा प्रताप चौक सिडको नाशिक येथे बरोबर 10.30 वाजता जमले.

दिवसभरात , दिलासा केअर सेंटर , प्रेमांगण केअर सेंटर, निरामय केयर सेंटर, साधना केअर सेंटर , सानिध्य केअर सेंटर अशा लागोपाठ पाच विझिट्स पूर्ण झाल्या,
आपल्या सर्व स्वयंसेवकांनी सर्व केअर सेंटर मधील सभासदांबरोबर मन मोकळेपणाने गप्पा मारल्या, त्यांनाही आपल्या टीम बरोबर मनमोकळेपणाने बोलावेसे वाटले , वेगवेगळ्या विषयांवर गप्पा मारल्या, त्यांना शरीराची काळजी घेण्यासाठी व्यायाम तसेच शरीराची काळजी घेण्यासाठी व्यायाम मेडिटेशन संदर्भात सूचना सांगितल्या, तसेच त्यांच्या आरोग्यासाठी प्रार्थना म्हटली , माया केअर फाउंडेशन ची संपूर्ण माहिती समजावून सांगितली , यानंतर एकंदरीत आपल्या टीमने पुन्हा पुन्हा विझिटसाठी यावे अशीच तिकडच्या सर्व मेंबर्स ची अपेक्षा वजा विनंती आहे. आपल्या सर्व टीमला भेटून सर्व मेंबर्सच्या चेहऱ्यावर आनंद झळकत होता.
तसेच इतर काही ठिकाणी इतर काही लोकांना ब्रोशर देऊन आपल्या माया केअर फाउंडेशन बद्दल माहिती देखील सांगण्यात आली.
या पाचही ठिकाणी भेटवस्तू म्हणून केळी देण्यात आली
स्वातंत्र्य दिनाच्या सर्वांना शुभेच्छा देण्यात आल्या स्वातंत्र्य दिनाच्या सर्वांना शुभेच्छा देण्यात आल्या माया केयर फाउंडेशन नाशिक टीम
जय हिंद

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!