सात्रळच्या रयत शैक्षणिक संकुलात स्वातंत्र दिन विविध उपक्रमांनी साजरा……..
निमगाव जाळी / लोकवेध live न्यूज अशोक गोसावी
रयत शिक्षण संस्थेचे, नानासाहेब सहादू कडू पाटील विद्यालय, बापूजी सहादू कडू पाटील कनिष्ठ महाविद्यालय व कोंडाबाई नानासाहेब कडू पाटील कन्या,विद्यालय सात्रळ ता.राहुरी जि.अ.नगर यांच्या संयुक्त विद्यमाने ७७ वा स्वातंत्र्यदिन साजरा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
याप्रसंगी रयत शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष अरुण कडू पाटील यांच्या समवेत अन्य मान्यवरांनी थोर स्वातंत्र सेनानी व माजी आमदार कॉ.पी.बी कडू पाटील तथा आप्पा यांच्या प्रतिमेस पुष्पांजली अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले.
क्रीडा शिक्षक अशोक भुसारी यांनी ध्वजारोहण कार्यक्रमाचे संचलन केले.अहमदनगर जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष व रयत शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष अरुण कडू पाटील यांच्या शुभहस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
यावेळी अरुण कडू पाटील यांनी स्वातंत्र लढ्याचे महत्व विशद केले. यावेळी त्यांनी सर्व उपस्थितीताना स्वातंत्र्य दिनाचा संदेश दिला. स्वातंत्र्य दिनाचेऔचित्य साधत मा.अरुण कडू पाटील व उपस्थित मान्यवरांच्या शुभहस्ते गुणवंत विद्यार्थ्यांचे बक्षीस वितरण कार्यक्रम संपन्न झाला.
बक्षीस वितरणाचे संचालन प्रकाश कुलथे व रचना फुलारी यांनी केले.
या कार्यक्रमासाठी ॲड.विजयराव कडू पाटील, डॉ.के.के.बोरा,शांतीभाऊ गांधी,बाळकृष्ण चोरमुंगे, दिनकरराव कडू, पत्रकार किशोर भांड, हिरानंदानी शेठ, प्रमोद कुलकर्णी रयत संकुलाच्या प्राचार्या सुशिलाताई थोरात,कन्या विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ.अनिता निबे,कडू वस्ती शाळेचे मुख्याध्यापक रा.ना शिंदे, केंद्र शाळेचे प्रभाकर शिंदे, आनंद गुरुकुलच्या मुख्याध्यापिका अर्चना प्रधान,सेंट पिओ मुख्याध्यापक ॲशली डिमोंड,के.डी तांबोळी, संभाजीराव अंत्रे, दत्तात्रय वदक, प्रभाकर आंधळे,आदि मान्यवर तसेच परिसरातील शाळेतील विद्यार्थी, शिक्षक,पालक व शिक्षकप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विलास गभाले यांनी केले तर आभार प्रदर्शन प्राचार्या सुशिला थोरात यांनी मानले.
