जादूटोणाविरोधी कायदा राज्यव्यापी जनसंवाद यात्रा  22 व 23 ऑगस्ट रोजी अहमदनगर मध्ये

 

निमगाव जाळी / लोकवेध live न्यूज / अशोक गोसावी

“महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष, अनिष्ट व अघोरी प्रथा व जादूटोणा प्रतिबंध व उच्चाटन कायदा 2013″अर्थात जादूटोणाविरोधी कायदा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या कायद्याला दहा वर्षे पूर्ण होत असल्याच्या निमित्ताने महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने राज्यव्यापी जादूटोणाविरोधी कायदा जनसंवाद प्रबोधन यात्रेची सुरुवात 20 ऑगस्ट 2023 पासून पुणे येथून सुरू झाली आहे.
या जनसंवाद यात्रेनिमित्त कायद्याबाबत चमत्कार प्रात्यक्षिकांसह शाळा, विद्यालयातील विद्यार्थी, पोलीस स्टेशन, विविध शासकीय कार्यालय व जनसामान्यांमध्ये संवाद साधला जाईल.
अहमदनगर जिल्ह्यात दिनांक 22 व 23ऑगस्ट 2023 रोजी अहमदनगर अनिस जिल्हाध्यक्ष अरुण कडू पाटील यांचे मार्गदर्शनाखाली दोन दिवस जनसंवाद यात्रेचे नियोजन केले आहे
मंगळवार दिनांक 22 ऑगस्ट 2023 रोजी
1) राधाबाई काळे महिला महाविद्यालय, तारकपूर अहमदनगर 2) शासकीय तंत्रनिकेतन (पॉलिटेक्निक कॉलेज),अहमदनगर.
3) शांतिनिकेतन कॉलेज ऑफ फार्मसी, धोत्रे बुद्रुक तालुका पारनेर
4) स्नेहालय, एमआयडीसी, अहमदनगर
5) जिल्हा पोलीस कार्यालय, अहमदनगर
बुधवार दिनांक 23 ऑगस्ट 2023 रोजी शेवगाव येथे
1) आर्ट्स, सायन्स ,कॉमर्स कॉलेज शेवगाव
2) पंचायत समिती शेवगाव तालुक्यातील अंगणवाडी सेविका
3) शेवगाव मध्ये सार्वजनिक ठिकाणी जाहीर कार्यक्रम
वरील प्रमाणे दोन दिवस जनसंवाद यात्रेतील महाराष्ट्र *अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे पदाधिकारी प्रशांत पोतदार, नंदिनी जाधव, भगवान रणदिवे* जादूटोणाविरोधी कायद्यासंदर्भात संवाद साधतील अशी माहिती अहमदनगर अनिसचे कार्याध्यक्ष मधुकर अनाप, अनिसचे ज्येष्ठ सदस्य व सामाजिक कार्यकर्ते डॉ. संजय लड्डा, महेश धनवटे यांनी दिली आहे.
या जनसंवाद यात्रेत जास्तीत जास्त नागरिकांनी जादूटोणाविरोधी कायदा समजून घेण्यासाठी सहभाग घ्यावा असे आवाहन महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती,अहमदनगर यांचे वतीने करण्यात येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!