रयत संकुल सात्रळ येथे डॉ. नरेंद्र दाभोळकर यांना अभिवादन व पुस्तक प्रकाशन समारंभ..

 

निमगाव जाळी /  लोकवेध live न्यूज / अशोक गोसावी 

19 ऑगस्ट 2023 रोजी सकाळी 9 वाजता रयत संकुल , सात्रळ येथे शहीद डॉ.नरेंद्र दाभोळकर यांना दहाव्या स्मृतिदिनानिमित्त अभिवादन सभा व पुस्तक प्रकाशन समारंभ रयत शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष, जिल्हा परिषद अहमदनगरचे माजी अध्यक्ष व अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अहमदनगर जिल्हाध्यक्ष अरुण कडू पाटील यांचे अध्यक्षतेखाली घेण्यात आला.
कार्यक्रमाचे उद्घाटन कुंडीतील रोपाला पाणी घालून करण्यात आले. डॉ.नरेंद्र दाभोलकर यांची दहा पुस्तके तसेच अंनिस कार्यकर्ते प्रभाकर नानावटी पुणे व सुकुमार मंडपे आणि प्रशांत पोतदार,सातारा यांच्या एकूण 12 पुस्तकांच्या संचाचे लोकार्पण अहमदनगर अ.नि.स.चेअध्यक्ष अरुण कडू पाटील व अहमदनगर अ.नि.स कार्याध्यक्ष मधुकर अनाप,अहमदनगर ,प्रभारी प्राचार्य थोरात मॅडम, मुख्याध्यापिका निबे मॅडम, पत्रकार किशोर भांड,बापू दिघे व इतर सहकाऱ्यां समवेत करण्यात आले.
डॉ. दाभोळकर यांच्या दहाव्या स्मृतिदिनानिमित्त त्यांना अभिवादन करताना मधुकर अनाप यांनी त्यांच्या समवेत केलेल्या कामाच्या आठवणींना उजाळा दिला. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीची भूमिका व कार्य नमूद करताना समिती देव व धर्म याबाबत तटस्थ असून या नावावर अनिष्ट चालीरीती रूढी परंपरा कर्मकांड यांच्या आधारावर होत असलेले शारीरिक आर्थिक मानसिक शोषण या विरोधी समितीचा लढाअसल्याचे सांगितले. जादूटोणाविरोधी कायद्याच्या आधारे अनेक बाबा बुवा मांत्रिक यांचा समितीने भांडाफोड केला असून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई झाली आहे. चळवळीचे कार्य केवळ भूत, भानामती ,बुवाबाजी विरोधी मर्यादित नसून स्वातंत्र्य, समता ,बंधुता ,धर्मनिरपेक्षता , लोकशाही या मूल्यांसाठी संघर्ष करणारी परिवर्तनवादी संघटना आहे.
यावेळी आदित्य दिवे व हमजा पठाण या विद्यार्थ्यांनी तसेच शिक्षक थोरात सर यांनी मनोगत व्यक्त केले.
प्र. प्राचार्य थोरात मॅडम यांनी उपस्थितांचे स्वागत व प्रस्ताविक केले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सतिष नालकर सर ,सूर्यवंशी सर, भुसारी सर, वसावे सर , दिघे सर यांनी विशेष परिश्रम घेतले
या प्रसंगी माध्यमिक व उच्च माध्यमिक विभागाचे शिक्षक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सच्चिदानंद झावरे यांनी केले तर प्रभारी पर्यवेक्षक त्र्यंबकराव राशिनकर यांनी आभार प्रदर्शन केले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!