पेटिट हायस्कूलच्या विद्यार्थिनींनी पाठविल्या भारतीय जवानांसाठी राख्या
संगमनेर / लोकवेध live न्यूज
आपला देश भारतीय संस्कृती रक्षक, कृषक व शिक्षक या तत्वावर उभा असून देशाचे रक्षण करणारा सैनिक, जगाचा पोशिंदा शेतकरी, आणि ज्ञानदानाचे पवित्र कार्य करणारा शिक्षक यांच्या ऋणात आपण राहिले पाहिजे. भारत मातेचे व बहिणीचे आयुष्यभर संकटाचे निराकरण करण्याची ही जबाबदारी भावाची रक्षाबंधनातून अधिक दृढ होते. हाच उद्देश डोळ्यासमोर ठेवून शहरातील आय.एस.ओ प्रमाणित गोखले एज्युकेशन सोसायटीच्या सर डी एम पेटिट हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाच्या विद्यार्थिनींनी ” एक राखी सैनिकांसाठी ” हा उपक्रम निश्चित विद्यार्थ्यांसाठी स्फूर्तीदायी व आत्मबल निर्माण करणारा ठरेल . देशाच्या सीमेवर आपल्या जीवाची तमा न बाळगता अहोरात्र लढणाऱ्या भारतीय जवानांसाठी विद्यालयाच्या विद्यार्थिनींनी राख्या तयार केल्या. या राख्या सीमेवर लढणाऱ्या जवानांसाठी पाठवण्यात आल्या आहे. विद्यालयाच्या सांस्कृतिक विभागाने हा उपक्रम हाती घेतला होता. विद्यार्थिनींनी राष्ट्रध्वज रंगाच्या व आकर्षक ,मनोवेधक विविध राख्या तयार केल्या आहे. या राख्यांचे आकर्षक पॅकिंग तयार केल्यानंतर विद्यार्थिनी प्रतिनिधी कुमारी गायत्री गवांदे हिने स्वराज्य सैनिक कल्याण संस्था संगमनेर शाखेचे अध्यक्ष माजी सैनिक प्रकाश कोटकर यांना सुपूर्द केल्या. या उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी विद्यालयाच्या प्राचार्या डॉ.अस्मिता देशपांडे , इन्चार्ज प्रा. गुलाब गायकवाड यांची प्रेरणा व बहुमोल मार्गदर्शन लाभले. तसेच कार्यक्रमासाठी सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा. श्रीमती शिंदे एस व्ही, सत्र प्रमुख प्रकाश वनम ,भूषण पाटील ,अमोघ कुलकर्णी, जगदीश सावंत, प्रा. दशरथ गभाले , गणेश कुलकर्णी, ग्रंथपाल सांगळे के के, श्री संतोष धुळे , माणिक भडांगे यांनी विशेष परिश्रम घेतले.
