संगमनेर डोंगरी जिल्हा सुरु करणेसाठी खा. सुजय विखेंनी मध्यस्थी करावी – देशमुख
पिंपरणे / लोकवेध live न्यूज
अहमदनगर जिल्ह्याचे विभाजन करून संगमनेर डोंगरी जिल्हा करावा संगमनेर तालुका हा मध्यवर्ती ठिकाण असून या ठिकाणी अनेक प्रकारचे शासकीय कार्यालय तसेच विविध प्रकारच्या सुविधा आहेत संगमनेर जिल्हा करण्यासाठी मध्यस्थी करावी
अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते आत्माराम देशमुख यांनी प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनाद्वारे केली आहे
प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात असे म्हटले आहे की
1950 पुर्वी लोणी हे गाव संगमनेर तालुक्यात होते. भंडारदरा कालवे 1910 ते 1926 पाटपाण्यामुळे व बेलापुर रेल्वे स्टेशनमुळे श्रीरामपुर तालुका एक प्रगत व अग्रेसर तालुका नावारुपाला आला स्वातंत्र्य प्राप्तीच्या दरम्यान त्यामुळे श्रीरामपूरने आपली एक नवीन ओळख निर्माण केली व साखर उत्पादनात मोठी गरुड झेप घेतली. मग लोणी बु तो पट्टा श्रीरामपुर तालुक्यात गेला. सन 26 जुन 1999 रोजी नवा राहाता तालुका अस्तित्वात आला.
संगमनेर हे शहर पुणे नाशिक मुंबई अहमदनगर (मध्य महाराष्ट्र) यामध्यभागी सर्वात जुने ऐतिहासिक शहर ते आढळा प्रवरा म्हाळुंगी तीरावर (त्रीवेणी संगम) वसलेले जुने शहर शिवाय पुणे नाशिक व्हा. संगमनेर हायस्पीड रेल्वेहमुळे मोठी विकासाची नवी पहाट उजाडली आहे औद्योगिकरण नोकऱ्या रोजगार संधी मिळुन विकास, प्रगती शिवाय अतिदुर्गम डोंगराळ, आदिवासी अकोले साठी मध्यवर्ती शहर व सर्व तालुक्यांना मध्यवर्ती त्यामुळे पुणे नाशिक संगमनेर हे तीनही जिल्हे एकमेकांना जोडुन पिंपरी चिंचवड सारखे औद्योगिकरण पट्टा तयार होईल त्यामुळे खा. डॉ. सुजयदादा विखे पा. यांनी हस्तक्षेप करुन अहमदनगरचे विभाजन करुन संगमनेर डोंगरी जिल्हा सुरु करणेसाठी मध्यस्थी करावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते आत्माराम देशमुख यांनी केली आहे
आपल्या घराण्याचा आशिया खंडायत नावलौकीक असुन आपणास यापुढे कधीतरी मुख्यमंत्री होण्याची निश्चीतच संधी मिळेल. जर आमच्या संगमनेर डोंगरी जिल्ह्याला डावलुन पार्सलीटी केली तर संगमनेर तालुक्यातील ओझर येथील दोन्ही कालवे संगमनेरकर व अकोलेकर बंद करतील. आम्ही संगमनेर डोंगरी जिल्ह्याच्या न्याय हक्कासाठी कुठलीही तडजोड मान्य करणार नाही. तरी खासदार सो आम्हाला न्याय मिळवुन द्यावा. आमची रास्त न्यायीक मागणी मंजुर करावी.सामाजिक कार्यकर्ते आत्माराम गजानन देशमुख
