संगमनेर तालुका फोटोग्राफर व व्हीडीओ ग्राफर असोसिएशनच्या अध्यक्षपदी गाडेकर तर उपाध्यक्षपदी पुरी
संगमनेर / लोकवेध live न्यूज
संगमनेर दि २७ रोजी संगमनेर तालुका फोटोग्राफर व व्हीडीओ ग्राफर असोसिएशनची वार्षीक सभा खेळीमेळीत पार पडली यावेळी नवीन अध्यक्ष उपाध्यक्ष सचिव इतर पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली यात अध्यक्षपदी राजु गाडेकर यांची व उपाध्यक्षपदी कालिचरण पुरी यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. तसेच सचिवपदी प्रविण थोरात खजिनदार अनिल कोल्हे प्रसिद्धी प्रमुख निलेश शिंदे संपर्कप्रमुख अंबादास हासे, विजय सांगळे कार्याध्यक्ष राजु शेलार तर सदस्यपदी संजय वाबळे, संतोष शिंदे दीपक घुले निसर्ग देशमुख कैलास खोले राजेंद्र गुळवे आरिफ सय्यद, गणेश येरमल यांची निवड झाली. यावेळी नवनिर्वाचित अध्यक्ष उपाध्यक्ष सचिव व सर्व सदस्यांचा सत्कार करण्यात आला व पुढील कार्यास शुभेच्छा देण्यात आल्या