रयत संकुल सात्रळच्या अथर्व बनगये व राहुल शिंदे यांची नेपाळ येथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड
(रयत संकुल,सात्रळची क्रीडा क्षेत्रातील ऐतिहासिक कामगिरी)
निमगाव जाळी / लोकवेध live न्यूज / अशोक गोसावी
अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये कोणतीही प्रगत सुविधा नसतानाही क्रीडा क्षेत्रामध्ये उत्तुंग यश संपादन करणारे सात्रळ ता.राहुरी जिल्हा अहमदनगर सारख्या खेड्यातील या क्रीडावीरांचे सर्वत्र कौतुक होत आहे.नुकतेच राजधानी दिल्ली येथील नेहरू स्टेडियमवर सुरू असलेल्या ३ -या युथ गेम्स नेशनल चॅम्पियन २०२३ च्या मैदानी /वैयक्तिक खेळात रयत शैक्षणिक संकुल मुले विभाग सात्रळच्या विद्यार्थ्यांनी चमकदार कामगिरी करत नानासाहेब सहादू कडू पाटील विद्यालय व बापूजी सहादू कडू पाटील कनिष्ठ महाविद्यालय, सात्रळचे आंतरराष्ट्रीय क्रीडा क्षेत्रात नाव झळकाविले .
क्रीडा क्षेत्रातील उल्लेखनीय यश संपादन करणाऱ्या राहुल प्रकाश शिंदें याने १७ वर्षाच्या वयोगटात लांब उडीत उत्कृष्ट प्रदर्शन करत सुवर्ण पदक पटकावले.तसेच इयत्ता १०वी चा विद्यार्थी अथर्व जालिंदर बनगयें याने १४ वर्षाच्या वयोगटात रनिंग मध्ये सुवर्ण पदक मिळवीत नेपाळ येथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड सार्थ केली.
*रयत संकुल,सात्रळचे कल्पक क्रीडा शिक्षक प्रा.पी.पी.सुर्यंवंशी यांचे या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन लाभले*. तसेच प्राचार्य आर बी बडे पर्यवेक्षिका एस आर थोरात प्रा.विलास दिघे, जेष्ठ शिक्षक त्रिंबक राशिनकर, केशव मुसमाडे, युनुस पठाण, सच्चिदानंद झावरे, भारत कोहकडे,संजय दिघे,प्रकाश कुलथे, विलास गभाले,ज्ञानदेव लेंडे, वैभव वसावे, कलाशिक्षक सतिश नालकर, शिवदास सातपुते, देविदास थोरात, जालिंदर बनगये, प्रमिलाताई पंडोरे, संगिताताई सांगळे, सुनिताताई ढोकणे, गिताजंली गोसावी ,प्रांजली फरकाडे,प्रा.अर्चना बनसोडे,पल्लवी गावडे,प्रविणाताई दिघे कावेरी वदक, प्रा.पंकज दिघे,प्रा.सतिश कदम,प्रा.आण्णासाहेब गोर्डे,प्रा.किशोर दातीर प्रा.विश्वास घुगे, सुदर्शन गिते, रत्नाकर सोनवणे आदिंचे सहकार्य लाभले.
यशस्वी विद्यार्थ्यांचे अहमदनगर जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष व रयत शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष अरुण कडू पाटील, रयत शिक्षण संस्थेच्या उत्तर विभागाचे विभागीय अधिकारी तुकाराम कन्हेरकर साहेब, सहाय्यक अधिकारी काकासाहेब वाळुंजकर, शिवाजीराव तापकीर, प्रगती पतसंस्थेचे चेअरमन ॲड विजयराव कडू पाटील, बबनराव कडू पा.संभाजीराव चोरमुंगे, मा.सरपंच भास्करराव फणसे, माजी सरपंच गणेश पाटील कडू,पत्रकार किशोर भांड,के.के.बोरा, शांतीभाऊ गांधी, युवानेते किरण पा.कडू, पंकज पा.कडू , विक्रांत पा.कडू,नूतन प्राचार्य आर.बी.बडे, पर्यवेक्षिका सुशिलाताई थोरात, रयत सेवक संघाचे माजी सरचिटणीस भाऊसाहेब पेटकर, सर्व स्कूल कमिटी सदस्य, ग्रामस्थ व पालक आणि शिक्षणप्रेमी यांनी अभिनंदन करून पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.
