काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते मा. महसूल व कृषी मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली शेतकऱ्यांची आर्थिक कामधेनु असलेल्या सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात अमृतवाहिनी सहकारी बँकेस राष्ट्रीय स्तरावरील पुरस्काराने महाबळेश्वर येथील शानदार कार्यक्रमात गौरविण्यात आले.
महाबळेश्वर येथे झालेल्या बँको या संस्थेच्या वतीने या पुरस्कार वितरण प्रसंगी बँकोचे राष्ट्रीय अध्यक्ष जोतींद्र भाई मेहता यांचे हस्ते हा पुरस्कार सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात अमृतवाहिनी बँकेचे चेअरमन सुधाकर जोशी, व्हा. चेअरमन ॲड.नानासाहेब शिंदे मुख्य कार्यकारी अधिकारी अंबादास वाणी यांनी स्वीकारला.सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात यांच्या आदर्श शिस्त व विचारांवर बँकेची वाटचाल सुरू असून काँग्रेसचे वरिष्ठ नेते आमदार बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली बँकेने सातत्याने ऑडिटचा अ दर्जा मिळून शेतकरी व सर्वसामान्य मदत केली आहे. अमृतवाहिनी बँकेने नुकताच दुग्धविकास कर्ज योजनेअंतर्गत सर्वसामान्यांच्या जीवनामध्ये आनंद पुरवण्याचे काम सुरू केले असून छोटे शेतकरी व व्यावसायिक यांच्यासाठी ही विविध योजना लागू केल्या आहेत. काळानुरूप केलेले बदल बँकेला लोकाभिमुख करण्याचा प्रयत्न यासह या बँकेचे संगणकीय कामकाज, एटीएम, नवीन अद्यावत सुविधांसह असलेली अमृतनगर येथील मुख्य शाखा व संगमनेर मार्केट यार्ड, नेहरू चौक, तळेगाव, घारगाव, साकुर या ठिकाणीही विविध शाखा कार्यरत आहेत. सभासद, शेतकरी व नागरिकांचा मोठा विश्वास या बँकेने संपादन केला असून बँकेच्या चांगल्या कामाबद्दल बँको या राष्ट्रीय स्तरीय संस्थेने सन 2021- 22 चा ब्ल्यू रिबन पुरस्काराने सन्मानित केले आहे.
या पुरस्कारानंतर बँकेचे चेअरमन सुधाकर जोशी म्हणाले की, हा पुरस्कार सांघिक कामाचा असून यामध्ये बँकेचे सर्व कर्मचारी, अधिकारी ,सभासद, बँकेचे ठेवीदार व कर्जदार यांचा मोठा वाटा आहे. आमदार बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली सर्वसामान्य जनतेला तत्पर सेवा देण्याच्या कामाला अधिक बळकटी मिळणार आहे.
या पुरस्काराबद्दल काँग्रेस नेते आमदार बाळासाहेब थोरात, माजी आ.डॉ सुधीर तांबे, आमदार सत्यजित तांबे, बाजीराव पा. खेमनर, ॲड. माधवराव कानवडे, सौ.दुर्गाताई तांबे, कॅन्सरतज्ञ डॉ जयश्रीताई थोरात,रणजीतसिंह देशमुख, बाबा ओहोळ,शंकर पा. खेमनर, संपतराव डोंगरे, लक्ष्मणराव कुटे आदींसह विविध पदाधिकाऱ्यांनी अभिनंदन केले आहे.
