रिक्त पोलीस पाटील पदे भरण्यासाठी प्रवर्ग निहाय महिला आरक्षण सोडत 12 सप्टेंबर रोजी होणार.
माढा तालुक्यातील 25 तर करमाळा तालुक्यातील 23 पोलीस पाटील पदे भरणार
माढा तालुका / लोकवे ध live न्यूज / हानुमंत मस्तुद
माढा तालुक्यातील 25 (लोंढेवाडी, सापटणे भो, अंजनगाव खे, उजनी मा., रोपळे खु, अकुंभे, शेडशिंगे, तांदुळवाडी, शेवरे, तडवळे म., वेणेगाव, वडाचीवाडी अ.ऊ, बुद्रुकवाडी, बिटरगाव, ढवळस,भोगेवाडी, शिंगेवाडी, कव्हे, महादेववाडी, आकुलगाव, रुई, आढेगाव, सुर्ली, भुताष्टे) व करमाळा तालुकयातील 23 (वडगाव ऊ, वडगाव द, पिंपळवाडी, जातेगाव, खडकी, कोर्टी, सावडी, विहाळ, बिटरगाव वां, पारेवाडी, हिंगणी, भगतवाडी, कोंढार चिंचोली, झरे, लव्हे, वडाचीवाडी, बाळेवाडी, धायखिंडी, पोफळज, हिसरे, निमगाव ह, शेलगाव क, बोरगाव) रिक्त पोलीस पाटील पदे भरती प्रक्रियेद्वारे भरावयाची असून याकामी प्रवर्ग निहाय महिला आरक्षण सोडत मंगळवार दि. 12 सप्टेंबर 2023 रोजी दुपारी 12 वाजता पंचायत समिती कार्यालय मिटींग हॉल कुर्डुवाडी ता. माढा येथे आयोजित करण्यात आलेली आहे. गावातील नागरिकांनी सदर आरक्षण सोडतीस उपस्थित राहण्याचे आवाहन माढा उपविभागीय दंडाधिकारी तथा पोलीस पाटील भरती 2023 च्या अध्यक्ष प्रियंका आंबेकर यांनी केले आहे.
