दूध भेसळ समिती व अन्न व औषध प्रशासन, बीड कडून 390 लिटर भेसळयुक्त दूध नष्ट
सय्यद इम्रान हाश्मी सहाय्यक संचालक यांची मोठी धाडसी कारवाई
बीड / लोकवेध live न्यूज
आज दि.१३/०९/२३ रोजी जिल्हा दूध भेसळ समिती व अन्न व औषध प्रशासन, बीड कडून मे. माऊली मिल्क प्रॉडक्ट, बार्शी नाका, बीड येथे तपासणी करण्यात आली.
तपासणी दरम्यान पेढी कडे सोडा हे भेसळकारी पदार्थ पेढीत अधळून आला आणि १४० लिटर गाय दूध व १५० लिटर म्हशी चे दूध संवशयाचे आधारे नष्ट करण्यात आले. एकूण ११,०८८/- रुपयांची जप्ती करण्यात आली.
तसेच पेढी अन्न सुरक्षा व मानके, कायदा २००६ चे उल्लंघन करत असल्याने सामान्य जन हितार्थ पेढी मध्ये अधळून आलेल्या तुरटी ची पूर्तता करे पर्यंत विक्री बंद चे आदेश देण्यात आले.
तपासणी दरम्यान काढलेले नमुने विश्लेषण साठी पाठविण्यात आले व पुढील कारवाई नमुने अहवाल प्राप्त झाल्यावर करण्यात येईल.
ही कारवाई श्री. संदीप देवरे, अन्न सुरक्षा अधिकारी यांनी श्री. सय्यद इम्रान हाश्मी, सहायक आयुक्त यांच्या उपस्थित व श्री. त्रिगुण कुलकर्णी अतिरिक्त जिल्हाधिकारी, बीड व श्री. अजित मैत्रे, सह आयुक्त, औरंगाबाद विभाग, अन्न व औषध प्रशासन, औरंगाबाद यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आली.
या वेळी अन्न व औषध प्रशासन चे नमुना सहायक श्री. उमेश कांबळे व दूध संकलन परियवेक्षक श्री. दत्तात्रेय कोंदिराम थोरात व विस्तार अधिकारी श्री. संतोष मोराळे हे उपस्थित होते.
