डॉ. मो.स.गोसावी यांच्या जयंतीनिमित्त पेटिट संकुलात विविध कार्यक्रम संपन्न

 

संगमनेर / लोकवेध live न्यूज 

 

येथीलआय.एस.ओ.प्रमाणित गोखले एज्युकेशन सोसायटीचे सर डी एम पेटिट विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात स्व. सर. डॉ. मो. स. गोसावी यांच्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. संपन्न झालेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे प्राचार्य श्री निकम सी एन यासह संगमनेर सिन्नर सेंटरच्या अधीक्षक व पर्यवेक्षिका डॉ. सौ.अस्मिता देशपांडे, जुनिअर कॉलेजचे इन्चार्ज प्रा. गुलाब गायकवाड उपस्थित होते. प्रारंभी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते स्वर्गीय डॉ. गोसावी यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले. यावेळी विद्यालयाच्या परिसरात मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. ग्रंथपाल सांगळे के.के यांच्या संकल्पनेतून डॉ. गोसावी यांच्या जीवन चरित्रांच्या पुस्तकांसह भित्तिपत्रकांचे प्रदर्शन भरविण्यात आले होते. विद्यार्थ्यांची रंगारी स्पर्धा संपन्न झाली. तदनंतर उपस्थित विद्यार्थ्यांना अथर्वशीर्ष पुस्तकांचे वाटप करून सामूहिक अथर्वशीर्षाचे पठण घेण्यात आले. विद्यार्थ्यांसह इन्चार्ज प्रा. गायकवाड यांनी डॉ. गोसावी साहेबांबद्दल आपले मनोगत व्यक्त केले. अधीक्षक डॉ.सौ. अस्मिता देशपांडे मॅडम यांनी तेजस्वी ज्ञानसूर्याचा यशस्वी जीवनप्रवास सांगताना डॉ.गोसावी सरांच्या संपूर्ण कार्याचा आढावा आपल्या समर्पक व्याख्यानातून विद्यार्थ्यांसमोर मांडला. यावेळी जुनियर कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी प्रश्नमंजुषा स्पर्धेत सहभाग घेऊन विजेत्या स्पर्धकांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक देऊन गौरविण्यात आले. गरजू व होतकरू विद्यार्थ्यांना मोफत गणवेश व खाऊचे वाटपही यावेळी करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य निकम सी. एन. यांनी केले. सत्र प्रमुख प्रकाश वनम यांनी सूत्रसंचालन करून प्रा. दशरथ गभाले यांनी सर्वांचे आभार मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्रा.भाऊसाहेब मांढरे,प्रा.परेश सांगवीकर,प्रा. स्वप्निल शिंदे,
प्रा. अमोल टेमक,प्रा, सुशीला चिमणकर,प्रा, सिमिका मिश्रा, प्रा. रूपाली देशमुख , क्रीडाशिक्षक उमेश गुंजाळ, जगदीश सावंत, गणेश कुलकर्णी, विशाल गावित, भूषण पाटील, योगेश देसले, बापू पाटील, शिवलिंग भोर, किनगे मॅडम, आदींसह श्री संतोष धुळे, माणिक भडांगे, मनीषा खाटेकर यांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमासाठी विद्यार्थ्यांसह सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!