पोखरी जि.प.शाळेत पाककृती स्पर्धा संपन्न..
विद्यार्थ्यांना मिष्टांन्न भोजनाची मेजवानी…
संगमनेर / लोकवेध live न्यूज
वडगाव पान केंद्रांतर्गत येणाऱ्या सर्व शाळांची केंद्रस्तरीय पाककृती स्पर्धा नुकतीच जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पोखरी हवेली येथे संपन्न झाली. प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजने अंतर्गत या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेसाठी एकूण 18 शाळांनी सहभाग नोंदवला.
याप्रसंगी केंद्राचे केंद्रप्रमुख एकनाथ साबळे, ज्येष्ठ मुख्याध्यापक ज्ञानदेव फड, शिवाजी नागरे,एकनाथ दिघे, उपसरपंच सोमनाथ थिटमे, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सचिन आगळे, लक्ष्मण दये,सामाजिक कार्यकर्ते इकबाल खेराणी,चिराग खेराणी,अनुप बुब,यामिनी बुब,रमेश गवांदे आदिसह स्पर्धक विद्यार्थी-शिक्षक उपस्थित होते. या स्पर्धेत समनापुर उर्दू शाळेचा प्रथम, मनोली शाळेने द्वितीय तर निळवंडे शाळेने तृतीय क्रमांक पटकावला .
या स्पर्धेदरम्यान गावातील सर्व अंगणवाड्या व जिल्हा परिषद शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना आपली पत्नी मिनुमुमताज खेराणी यांच्या स्मृती प्रित्यर्थ इक्बाल खेराणी यांनी मिशन आपुलकी उपक्रमांतर्गत गुलाबजामून व व्हेज बिर्याणीचे मिष्टान्न भोजन तसेच शुद्ध पिण्याच्या पाण्यासाठी एक्वा फिल्टर दिले.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी एकनाथ साबळे यांच्या मार्गदर्शनाखाली परीक्षक अश्विनी मंजुरे, अशोक हांडे, शकुंतला शेळके, पदवीधर शिक्षक रावसाहेब पावसे,सुरेश साळुंके, दस्तगीर शेख, सखाराम पाटील,राजेंद्र सूर्यवंशी, सोमनाथ मदने आदींनी विशेष परिश्रम घेतले.
