तालुकास्तरीय शालेय व्हॉलीबॉल स्पर्धेत श्री दत्त माध्यमिक विद्यालयाचे यश

अंबाजोगाई / लोकवेध live न्यूज 

 

अंबाजोगाई येथील दादाराव कराड माध्यमिक विद्यालय येथे दि. १८ सप्टेंबर रोजी झालेल्या तालुकास्तरीय शालेय व्हॉलीबॉल स्पर्धेत सोमनाथ बोरगाव येथील श्री दत्त माध्यमिक विद्यालयाच्या १४ वर्षाखालील मुलींच्या संघाने प्रथम क्रमांक मिळवला आहे. या संघाची जिल्हास्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धेसाठी निवड झाली आहे. तसेच या शाळेच्या १७ वर्षाखालील मुलांच्या गटाने तालुकास्तरीय शालेय व्हॉलीबॉल स्पर्धेत द्वितीय क्रमांक मिळवला आहे.
प्रथम आलेल्या संघात कु. प्रगती काकडे, समृद्धी कुर्डे, राणी गवळी, नंदा कुर्डे, भाग्यश्री सोमवंशी, किर्ती यादव, अक्षरा काकडे, आर्या साखरे, संध्या वैरागे या खेळाडूंचा सहभाग होता. या संघास शाळेतील क्रीडा शिक्षक तातेबा काळे यांचे मार्गदर्शन लाभले. या विजयी संघाचे संस्थेचे सचिव राजेंद्र लोमटे, उपाध्यक्ष सतीश लोमटे, शाळेचे मुख्याध्यापक दिलीप तनपुरे, सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!