क्षणभर आठवलं बालपण ; पोखरी हवेली येतील जि . प.शाळेत आजी-आजोबा संमेलन उत्साहात…
पिंपरणे / लोकवेध live न्यूज
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पोखरी हवेली येथे आजी आजोबा संमेलन उत्साहात साजरे झाले. याप्रसंगी ग्रामपंचायतचे सरपंच सुदाम खैरे,उपसरपंच सोमनाथ थिटमे,शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सचिन आगळे, उपाध्यक्ष संदीप खैरे, माजी सरपंच गोपीनाथ आगळे,बाबासाहेब थिटमे,बाबासाहेब थिटमे,ख्याध्यापक एकनाथ साबळे यांसह विद्यार्थ्यांचे आजी-आजोबा मोठ्या संख्येने उपस्थित होते.
. लेझीम पथकाच्या गजरात आजी-आजोबांचे स्वागत करण्यात आले. त्यांच्यावर पुष्पवृष्टी करण्यात आली.आपल्या नातवंडांकडून आजी-आजोबांचे पाद्यपूजन करण्यात येऊन आलिंगन देण्यात आले.याप्रसंगी आजी-आजोबा भावुक झाले होते.
यावेळी आजी-आजोबांच्या संगीत खुर्ची,रस्सीखेच,100 मीटर धावणे,उखाणे म्हणणे,बादलीत चेंडू टाकणे आदि स्पर्धा घेण्यातआल्या.आजी-आजोबांमधील प्रत्येक स्पर्धेतील विजेत्या स्पर्धकास पुस्तक व पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले.क्षणभर आम्हांला आमचं बालपण आठवल्याची, तसेच हा उपक्रम स्तुत्य असल्याची भावना अनेक आजी-आजोबांनी बोलून दाखवली. कार्यक्रमाच्या समारोपप्रसंगी आजी-आजोबांची पावले संगीताच्या तालावर थिरकली.
. कार्यक्रम यशस्वीतेसाठी विस्तार अधिकारी दीपक त्रिभुवन व मुख्याध्यापक एकनाथ साबळे यांच्या मार्गदर्शनाखाली पदवीधर शिक्षक रावसाहेब पावसे,सुरेश साळुंके,दस्तगीर शेख,शकुंतला शेळके,सखाराम पाटील,राजेंद्र सूर्यवंशी आदींनी विशेष परिश्रम घेतले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सोमनाथ मदने यांनी केले.
