गगनगिरी विद्यालयात सायबर गुन्हा जागृती कार्यशाळा संपन्न
पिंपरणे / लोकवेध live न्यूज
संगमनेर तालुक्यातील पिंपरणे येथील परमपूज्य गगनगिरी महाराज विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात सायबर गुन्हा जागृती कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.सध्या सायबर सुरक्षा जागृती अत्यावश्यक आहे. सायबर क्राईम ही आंतरराष्ट्रीय समस्या झाली आहे. विद्यार्थ्यांनी याबाबत सावधगिरी बाळगावी. कुतूहलापोटी अथवा अपुऱ्या किंवा चुकीच्या माहितीमुळे फसगत होऊ शकते. त्यातून गंभीर स्वरूपाचा गुन्हा अथवा नुकसान होऊ शकते .यासाठी विद्यार्थ्यांनी इंटरनेट,मोबाईल वापरताना विशेष काळजी घ्यावी असे आवाहन याप्रसंगी करण्यात आले.
संगमनेर महाविद्यालयाच्या बी.सी.ए. वर्गातील विद्यार्थ्यांनी ही कार्यशाळा घेतली. भाग्यश्री सोनवणे, वैष्णवी राक्षे, ऋतिक हासे,प्रमोद गांजवे या विद्यार्थ्यांनी या कार्यशाळेत मार्गदर्शन केले. व्हाट्सअप,फेसबुक, इंस्टाग्राम, फोन पे,गुगल पे इत्यादींचा वापर सध्या सर्वच क्षेत्रात होत आहे. विद्यार्थीही ही ॲप वापरत आहेत. याचा वापर करताना कोणती काळजी घ्यावी, ऑनलाइन भ्रष्टाचार, लोन फ्रॉड, फेस फोड ,व्हाईस फ्रॉड यापासून विद्यार्थ्यांनी सावध कसे राहावे हे विद्यार्थ्यांना सांगण्यात आले. ओटीपी चा नेमका अर्थ काय आहे.तो इतरांना का देऊ नये ,आपले विविध ॲप संबंधातील अकाउंट प्रायव्हेट ठेवावे. ॲपचा पासवर्ड नेहमी स्ट्रॉंग ठेवावा. ॲप डाऊनलोड करताना, परमिशन देताना कोणती काळजी घ्यावी. यासंदर्भात सविस्तर माहिती विद्यार्थ्यांना देण्यात आली.
तीन स्वतंत्र गटांमध्ये या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.
इयत्ता पाचवी ते सातवी, इयत्ता आठवी ते दहावी आणि इयत्ता अकरावी बारावी या विद्यार्थ्यांना स्वतंत्रपणे वयोगटानुसार मार्गदर्शन करण्यात आले.
या कार्यशाळेस प्राचार्य मुकुंद डांगे, श्री. डी.आर.सोनवणे,श्री दिलीप डोंगरे, श्री रमेश वाळे, प्रा.अविनाश जोंधळे, प्रा.रुपाली हासे, प्रा.राजश्री मांढरे, प्रा. वैशाली कुटे, प्रा.मंगल शिंदे ,प्रा. किशोर बांगर,प्रा भाऊसाहेब पानसरे श्री दत्तात्रय घोगरे श्री तथागत रोकडे श्री विश्राम घाणे श्री ललित शेळके श्री धींदळे सरश्रीमती सांगळे मॅडम गोसावी मॅडम ढोमसे मॅडम आदी शिक्षक उपस्थित होते. विद्यार्थ्यांनी या कार्यशाळेत उत्साहाने सहभाग घेतला.
