संगमनेर तालुक्यासह अहमदनगर जिल्ह्यामध्ये दुष्काळ जाहीर करा – किसान युवा क्रांती संघटना

 

संगमनेर / लोकवेध live न्यूज 

मागणी क्रमांक 1- संगमनेर तालुक्यासह अहमदनगर जिल्हा दुष्काळग्रस्त जिल्हा म्हणून जाहीर करा.
मागणी-2 संगमनेर तालुक्यासह अहमदनगर जिल्ह्यामध्ये गावोगावी जनावरांसाठी चारा छावण्या त्वरित सुरू करण्याबाबत.
मागणी-3 साखर कारखाना गळीत हंगाम सुरू होण्यापूर्वी शेतकऱ्यांच्या जनावरांच्या चाऱ्यासाठी ऊस हे पीक आरक्षित ठेवून उर्वरित ऊस कारखान्यात द्यावेत.
मागणी-4 ज्या शेतकऱ्यांनी पिक विमा भरलेला आहे अशा शेतकऱ्यांना तातडीने नुकसान भरपाई देण्यात यावी.
मागणी-5 निळवंडे कॅनॉल ला पाणी सोडून त्यामधून घुलेवाडी गावातील भेंडाळे पाझर तलाव भरण्यात यावा.

 

संगमनेर तालुक्यामध्ये सन 2023 -24 मध्ये सरासरी 39% पेक्षाही कमी पावसाची नोंद झालेली आहे. संगमनेर तालुक्यामध्ये कमी पाऊस झाल्यामुळे शेतकऱ्यांना जनावरांचा चाऱ्याचा, पिण्याच्या पाण्याचा, शेतीच्या पाण्याचा, मोठा ज्वलंत प्रश्न उभा राहिला आहे. शेतकऱ्यांची शेती पिक बाजरी, मका ,सोयाबीन, कांदा, कडधान्य व अन्य खरीप पिके जळालेले आहेत. शेतकऱ्यांचा खूप मोठ नुकसान झालेलं आहे. त्यामुळे शासनाने त्वरित संगमनेर तालुक्यासह अहमदनगर जिल्हा दुष्काळग्रस्त जिल्हा म्हणून जाहीर करावा. तसेच तालुक्यातील दुष्काळी परिस्थिती असल्यामुळे जनावरांच्या चाऱ्याची मोठी टंचाई निर्माण झालेली आहे. त्यामुळे शासनाने त्वरित प्रत्येक गावात जनावरांच्या चारा छावण्या सुरू कराव्यात तसेच भंडारदरा धरण पूर्ण क्षमतेने भरल्यानंतर निळवंडे कॅनॉल मध्ये शिल्लक असलेल्या पाण्यामधून निळवंडे कॅनॉल ला पाणी सोडण्यात यावे व त्यामधून घुलेवाडी गावातील भेंडाळे पाझर तलाव पूर्ण क्षमतेने भरण्यात यावा.
अहमदनगर जिल्ह्यातील सर्वच खाजगी व सहकारी साखर कारखान्यांचे गळीत हंगाम सुरू होण्यापूर्वी शेतकऱ्यांच्या जनावरांसाठी ऊस हे पिक चारा म्हणून आरक्षित ठेवण्यात याव व त्याचे नियोजन करून उर्वरित ऊस कारखान्यात देण्यास काही हरकत नाही ज्या शेतकऱ्यांनी 2023 -24 या काळातील खरीप पिकाची नोंद पीक पाहणी मध्ये केलेली आहे अशा सर्व शेतकऱ्यांना तातडीने नुकसान भरपाई देण्यात यावी
वरील सर्व मागण्यासंदर्भात निवेदन किसान युवा क्रांती संघटना अहमदनगरचे जिल्हाध्यक्ष -श्री सिताराम पानसरे सर तसेच संघटनेचे पदाधिकारी श्री नवनाथ राऊत ,श्री सारंग पानसरे, जीवनज्योत फौंडेशन चे अध्यक्ष-श्री.रोशन कोथमिरे तसेच
श्री.प्रशांत राऊत यांच्या वतीने राज्याचे विद्यमान महसूल मंत्री, ना.राधाकृष्ण विखे पा.पशुसंवर्धन दुग्धविकास मंत्री तथा अहमदनगर पालकमंत्री महाराष्ट्र राज्य व संगमनेरचे तहसीलदार श्री धीरज मांजरे साहेब यांना देण्यात आले. मंत्री महोदयांनी या निवेदनावर तात्काळ कार्यवाही करू असे आश्वासन दिले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!