संगमनेर तहसील मध्ये स्वच्छ भारत अभियानाचा फज्जा
संगमनेर / लोकवेध live न्यूज / अण्णासाहेब काळे
स्वच्छ भारत मिशन हे देशातील शहरी भागात स्वच्छता राखणे आणि घनकचरा व्यवस्थापन सुधारण्यासाठी शासनाने सुरू केलेले मिशन आहे मात्र याच अभियानाचा संगमनेर येथील तहसील कार्यालयात फज्जा उडाला आहे.
तहसील कार्यालयाच्या या महसूल इमारतीत तहसील,दुय्यम निबंधक,शहर पोलिस ठाणे रेकॉर्ड रूम सह या कार्यालयांचे वेगवेगळे विभाग आहे दिवसभरात या इमारतील अनेक लोक येथील कार्यालयात येत असतात नेहमीच गजबजलेल्या असलेल्या या इमारतीच्या तिन्ही मजल्यावर सार्वजनिक शौचालये आहे परंतु या सर्व शौचालयात घाणीचे साम्राज्य पसरले आहे येथील मुताऱ्यात पाणी नसल्याने दुर्गंधी येते तसेच शैचालयाच्या दरवाज्याची मोडतोड झाली असुन शैचालयात कागद, पाण्याच्या रिकाम्या बाटल्या पडलेल्या असतात तसेच इतरत्र विष्ठा पडलेली असते गुटखा तंबाखू खाऊन येथील पाण्याच्या भांडत लोक थुकतात पाण्याचा अभाव असल्यामुळे थुंकीमुळे डाग घट्ट झाले आहे तसेच येणारे लोक आणि शासकीय कर्मचारी यांच्या धुम्रपानामुळे येथील भिंती आणि कोपरे रंगले आहे या अस्वच्छतेमुळे या इमारतीची रयाच गेली आहे याबाबत अधिकारी वर्ग थुंकणाऱ्यावर कुठलाही कारवाई करत नसल्याने स्वच्छता प्रेमी मधुन संताप व्यक्त होत असून याकडे प्रकाराकडे अधिकाऱ्यांनी लक्ष घालावे अशी मागणी होत आहे
