गरुड झेप चे सामाजिक कार्य स्फूर्तीदायी – नितीन गडकरी

नाशिक / लोकवेध live न्यूज / निलेश शेकोकार

 

जागतिक स्तरावर वाहतूक अपघात हा कळीचा मुद्दा बनला आहे. सर्वात जास्त मृत्यू रस्ता अपघातात होत आहेत .अशावेळी डॉ संदीप भानोसे आणि त्यांचे सर्व गरुडझेप प्रतिष्ठान ची टीम वाहतूक सुरक्षा अभियान राबवत खूप मोठे कार्य करत आहे. याची दखल आंतरराष्ट्रीय स्तरावर घेतली गेली आहे असे प्रतिपादन केंद्रीय रस्ता वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी केले.

गरुड झेप प्रतिष्ठानच्या माध्यमातून गेले 2000 + दिवस वाहतूक सुरक्षा व पर्यावरण रक्षा अभियान सातत्यपूर्णरित्या राबविले जात आहे. त्याचा समाजामध्ये सकारात्मक परिणाम देखील दिसत आहे.
25 मार्च 2018 रोजी सदर अभियान सुरू करण्यात आले. 15 सप्टेंबर 2023 रोजी सातत्यपूर्ण दोन हजार दिवस पूर्ण झाले आहेत .
याची जागतिक विक्रमात देखील नोंद झाली आहे .
वाहतूक सुरक्षा अभियानाचे 2000 दिवस पूर्ण झाल्या निमित्त व नवीन जागतिक विक्रम नोंदविल्याबद्दल नितीन गडकरी यांच्या शुभहस्ते डॉक्टर भानोसे यांनी जागतिक विक्रम प्रमाणपत्र स्वीकारले. स्वतःचा ज्येष्ठ मुलगा श्रेयस भानोसे गेली 28 वर्षे मेंदूच्या ऑपरेशनमुळे झोपून असून देखील डॉ संदीप भानोसे समाजासाठी रस्ता वाहतूक अभियान चिकाटीने ,जिद्दीने , संयमाने तसेच सकारात्मकतेने अविरत करत आहेत. त्यांचे हे सामाजिक भान व राष्ट्राप्रती असलेली निष्ठा खरोखरच प्रेरणादायी आहे असे गौरव उद्गार गडकरी यांनी काढले व पुढील अभियानासाठी हार्दिक शुभेच्छा सर्व कार्यकर्त्यांना दिल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!