बहुजन समाजाला मूळ प्रवाहात आणण्याचे कार्य कर्मवीरांनी केले – माजी राज्यमंत्री प्राजक्तदादा तनपुरे

 

निमगाव जाळी / लोकवेध live न्यूज / अशोक गोसावी

 

रयत शिक्षण संस्थेच्या नानासाहेब सहादू कडू पाटील विद्यालय, बापूजी सहादू कडू पाटील कनिष्ठ महाविद्यालय व श्रीमती कोंडाबाई नानासाहेब कडू पाटील कन्या विद्यालय सात्रळ ता.राहुरी यांच्या संयुक्त विद्यमाने थोर शिक्षणमहर्षी पद्मभूषण डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांचा १३६वा जयंती समारंभ रयत संकुल,सात्रळ येथे दि.२२सप्टेंबर २०२३ रोजी मोठ्या उत्साहात संपन्न झाला. या समारंभ प्रसंगी प्रमुख पाहुणे व महाराष्ट्र राज्याचे माजी राज्यमंत्री आमदार प्राजक्तदादा तनपुरे यांनी आपले विचार मांडताना सांगितले की थोर शिक्षण महर्षी पद्मभूषण डॉ.कर्मवीर भाऊराव पाटील यांनी स्थापन केलेल्या महान अशा रयत शिक्षण संस्थेत शिकणारे विद्यार्थी फार नशीबवान आहेत. एवढी त्यांनी कर्मवीरांच्या कार्याचा परिचय करून देताना सांगितले की कर्मवीरांचे शैक्षणिक कार्य प्रत्यक्षात उतरविण्याचे कार्य थोर स्वातंत्र्यसेनानी माजी आमदार कॉ.पी बी कडू पाटील यांनी केले. यासाठी कडू पाटलांनी आपल्या सर्वस्वाचा त्याग केला.या कामी त्यांनी आपल्या कुटुंबाचीही पर्वा केली नाही कर्मवीरांनी व आप्पांनी त्याकाळात कोणत्याही भौतिक सुविधा नसतानाही शाळा सुरू करून बहुजनांच्या लेकरांना मुख्य प्रवाहात आणण्याचे महान कार्ये केले.तरी पण आजही महाराष्ट्रातील कित्येक शाळा मंदिरातच भरतात.आज कर्मवीरांचे शैक्षणिक कार्य जर खऱ्या अर्थाने पुढे न्यायचे असेल व शिक्षणाचा दर्जा सुधरावयाचा असेल तर आज शिक्षकांची अशैक्षणिक कामे काढून त्यांना फक्त शिक्षणाचे काम दिले गेले पाहिजे यावेळी त्यांनी दिल्ली सरकारच्या शैक्षणिक कार्याचीही माहिती दिली कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी व अहमदनगर जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष व रयत शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष अरुण कडू पाटील यांनी आपले विचार प्रगट करताना सांगितले की कर्मवीर जयंती सारखे कार्यक्रम हे विद्यार्थी संस्कारासाठीच असतात आजच्या विद्यार्थ्यांना कर्मवीर आण्णा व थोर स्वातंत्र्य सेनानी पी.बी.कडू पाटील यांच्या शैक्षणिक कार्याची माहिती असणे गरजेचे आहे ज्या काळात कोणत्याही भौतिक सुविधा उपलब्ध नसतानाही सात्रळ अशा अत्यंत खेड्यात कर्मवीर भाऊराव पाटील व कॉ.पी. बी कडू पाटील यांनी शाळा सुरू करून बहुजनांना मुख्य प्रवाहात आणण्याचे महान कार्य केले. आप्पा व कर्मवीर यांची ही भेट ऐतिहासिक अशी घटना आहे. अशा या रयत शिक्षण संस्थेच्या उभारणीत नगर जिल्ह्यातील अनेक दिग्गजानी हातभार लावलेला आहे.कर्मवीरांनी केलेल्या शैक्षणिक कार्याची नोंद जगाने घेतलेलीच आहे मात्र त्यांच्या या कार्याचा उचित गौरव म्हणून भारत सरकारनेही त्यांना भारतरत्न देऊन त्यांच्या कार्याचा गौरव केला पाहिजे. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक रयत संकुलचे प्राचार्य आर.बी बडे यांनी केले यावेळी त्यांनी कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या शैक्षणिक कार्याचा व थोर स्वातंत्र्य सेनानी कॉ. पी.बी कडू पाटील यांच्या कार्याचा आढावा घेत विद्यालयाच्या शैक्षणिक प्रगतीचा आढावा सादर केला. यावेळी रयत संकुल, सात्रळ कन्या विभागाचे मंगेश कडलग यांना राज्य शासनाचा क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले राज्य पुरस्कार मिळाल्याबद्दल मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सात्रळ नं२वि.वि.क.सह सोसायटीचे चेअरमन दिनकरराव कडू पाटील हे होते. या समारंभास प्रगती पतसंस्थेचे चेअरमनॲड. विजयराव कडू पा, व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष संभाजीराव चोरमुंगे पा.युवा नेते किरण पाटील कडू, स्थानिक स्कूल कमिटीचे सदस्य पंकज कडू पाटील,विक्रांत पाटील कडू,माजी सरपंच गणेश पाटील कडू,पत्रकार किशोर भांड, रयत सेवक संघाचे मा. सरचिटणीस भाऊसाहेब पेटकर, छगनराव वारुळे,राजेंद्र कडू,शांतीभाऊ गांधी, गुरुमुखदास हिरानंदानी एकनाथराव जाधव,सिताराम शिंदे,सागर डूक्रे नाना दिघे गोरखबाबाअंत्रे,आण्णासाहेब कडू ,पोपटराव कडू बापूसाहेब बेंद्रे हर्षल कडू प्राचार्य मधुकर अनाप,माजी विभागीय अधिकारी आण्णासाहेब साबळे आर.बी कडू ,अमोल दिघे पत्रकार समर्थ वाकचौरे पत्रकार अमोल अंत्रे,पत्रकार अशोक गोसावी,पत्रकार संभाजी कडू पा. प्राचार्यआर.बी बडे, मुख्याध्यापिका ए.व्ही. निबे, पर्यवेक्षिका एस आर थोरात, सर्व सेवकवृंद ,सर्व शालेय कमिटी,सदस्य, ग्रामस्थ व विद्यार्थी – विद्यार्थिनी सात्रळ, सोनगाव,धानोरे, पाथरे, हनुमंतगाव ,पंचक्रोशी ग्रामस्थ. मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विलास गभाले व प्रकाश कुलथे यांनी केले तर मुख्याध्यापिका अनिता निबे यांनी आभार मानले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!