वरवंडीत ब्रह्मलीन माणिकगिरी, बिरोबा महाराज फिरत्या नारळी सप्ताहाची आयोजन बैठक संपन्न
पिंपरणे / लोक वेध live न्यूज 
तालुक्यातील वरवंडी पंचक्रोशीतील भाविकांचे श्रद्धास्थान असलेले श्री क्षेत्र रामेश्वर मठ येथे ब्रह्मलीन माणिकगिरी,बिरोबा महाराज अखंड हरिनाम महासप्ताहाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती येथील गुरुवर्य महंत दत्तगिरी महाराज यांनी दिली.
येथील रामेश्वर मंदिराच्या सभामंडपात सप्ताह संदर्भात नुकतीच बैठक बोलवण्यात आली होती यावेळी बैठकीस गावातील अनेक गावकरी भाविक पुढारी आदी सर्व जण उपस्थित होते प्रसंगी अध्यक्ष पदावरून बोलताना दत्तगिरी महाराज म्हणाले की आपल्या वरवंडी पंचक्रोशीतील ह्या सर्वात मोठ्या म्हणजे महासप्ताहाचे आयोजन रविवार दि.१७ डिसेबर २०२३ रोजी केले असून या अखंड हरिनाम सप्ताहसाठी सर्व गावकरी तालुक्यातील भाविक भक्तांनी तन्मयतेने सामील व्हावे, यावेळी वरवंडी गावातील सर्व लोकांनी या सप्ताहाची जोरदार तयारी सुरू केली असून सर्व भाविक भक्तांनी सप्ताह काळात गुण्यागोविंदाने एकत्र यावे असे आवाहन देखील त्यांनी केले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!