राज्याचे जलसंपदा विभागाचे सहसचिव सतीषराव जोंधळे यांचा जाहीर नागरी सत्कार संपन्न

लोकवेध live न्यूज / निमगाव जाळी / अशोक गोसावी 

आपले नियमित काम क्षमतेने सांभाळताना सामाजिक कामही करता येते या भूमिकेतून काम करणारे,निमगाव जाळी गावचे सुपूत्र,मंत्रालय मधील सहसचिव व मराठा महासंघाचे उपाध्यक्ष मा. सतीशराव कारभारी जोंधळे साहेब यांच्या 53 व्या वाढदिवसानिमित्त निमगाव जाळी ग्रामस्थांच्या वतीने व विविध संस्थांच्या वतीने त्यांचा नागरिक सत्कार के.आर. जोंधळे कृषी व सेवाभावी संस्थेच्या सभागृहात आज संपन्न झाला. यावेळी सतीशराव जोंधळे साहेब यांनी के.आर जोंधळे कृषी व सेवाभावी संस्थेला सेवाभावी कार्यासाठी ५३०००/- रू ची देणगी प्रदान केली.त्यानिमित्ताने के.आर.जोंधळे सेवाभावी संस्थेच्या वतीने त्यांच्या 53 व्या वाढदिवसानिमित्त व त्यांची मराठा सेवा संघाच्या राष्ट्रीय उपाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल जाहीर सत्कार करण्यात आला.या निमित्ताने संस्थेचे अध्यक्ष अशोक वदक, उपाध्यक्ष हेमंतशेठ तांदळे, संस्थापक अध्यक्ष, सुनिलदादा डेंगळे, राम गायकवाड , गणपत तांबे, शरद तांबे, बाबासाहेब गागरे , दुधेश्वर उपसा जलसिंचन संस्थेच्या वतीने चेअरमन नंदू डेंगळे, उपाध्यक्ष रामकृष्ण लंगोटे सर,सदस्य बाळासाहेब तळोले, निमगाव जाळी ग्रामपंचायतीच्या वतीने सरपंच सौ.प्रतिभाताई जोंधळे, उपसरपंच ज्ञानेश्वर डेंगळे, सदस्य सुरेश डेंगळे, सदस्य माऊली डेंगळे, सदस्य दिलीपराव डेंगळे, सदस्य वैभव वदक, विविध सेवा सोसायटी च्या वतीने चेअरमन ठकाजी थेटे,प्राचार्य दिपकराव डेंगळे ,सदस्य सोमनाथ जोंधळे , संजय थेटे आदी मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन ज्ञानेश्वर रसाळ सर यांनी केले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!