बहुजनांच्या शिक्षणासाठी कर्मवीरांनी रयत शिक्षण संस्थेची स्थापना केली – डी वाय एस पी सोमनाथ वाकचौरे

 

निमगाव जाळी / लोक वेध live न्यूज / अशोक गोसावी 

रयत शिक्षण संस्थेच्या आश्वी इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय आश्वी बु ता.संगमनेर येथे रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक थोर शिक्षण महर्षी पद्मभूषण डॉ.कर्मवीर भाऊराव पाटील यांचा 136 वा जयंती सोहळा आज संपन्न झाला.यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे संगमनेर विभागाचे डी.वाय. एस.पी सोमनाथ फकीरा वाघचौरे यांनी आपले विचार मांडताना सांगीतले की बहुजन समाजाला सुशिक्षित करण्याचे महान कार्य कर्मवीर भाऊराव पाटलांनी केले. बहुजनांना शिक्षण मिळावे या तळमळीतूनच कर्मवीर भाऊराव पाटलांनी रयत शिक्षण संस्थेची स्थापना केली.सर्व जाती धर्माच्या मुलांना शिक्षण मिळावे ही कर्मवीरांची तळमळ होती. विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना त्यांनी मोबाईलच्या अति वापराविषयी सांगितले की गरज नसेल तेव्हा मोबाईल वापरू नका आणि वापरायचाच असेल तर अतिशय जबाबदारीने वापरा कारण नंतर मुलांबरोबरच पालकांवर पश्चाताप करण्याची वेळ येते अशी वेळ आई-वडिलांवर येऊन देऊ नका कारण वेळ निघून गेल्यानंतर पश्चाताप शिवाय काहीही शिल्लक राहत नाही. मुलींनी तर मोबाईल पासून सावध राहण्याचा आटोकाट प्रयत्न केला पाहीजे.आपल्या एखाद्या कृतीने आपल्या आई-वडिलांची मान खाली जाईल अशी कोणतीही कृती घडता कामा नये याचा विचार विद्यार्थ्यांनी करावा. कर्मवीरांच्या शिक्षण संस्थेमध्ये चांगल्या विचाराचे अवलंबन करून विद्यार्थ्यांनी आपले चांगले स्वप्न पूर्ण करण्यासाठी अविरत प्रयत्न करावे यासाठी स्पर्धा परीक्षेची कास धरून उत्तम अधिकारी बनण्याचा प्रयत्न केला पाहिजे. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व प्रमुख अतिथी परिचय प्राचार्य जनार्दन बर्डे यांनी करताना त्यांनी कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या शैक्षणिक कार्याचा आढावा घेत विद्यालयाच्या प्रगतीचा अहवाल सादर केला. शाखा इतिहास वाचन संसारे एस एफ मॅडम यांनी केले. यावेळी उपस्थित मान्यवरांच्या शूभहस्ते यशस्वी विद्यार्थ्यांना बक्षीस वितरण करण्यात आले. विद्यालयाच्या विद्यार्थिनी शिंदे अनुष्का व प्रांजल थोरात यांनी आपले मनोगत व्यक्त केले.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी लोकसत्ताचे ज्येष्ठ पत्रकार सिताराम चांडे हे होते. त्यांनी आपले विचार मांडताना सांगितले की एका कौटुंबिक प्रसंगात घरात कर्मवीरांच्या वडिलांकडून त्यांचा अपमान झाला यावेळी पत्नी लक्ष्मीबाईंचे अश्रूंचे थेंब त्यांच्या ताटात पडले या प्रसंगाने भाऊराव व्यथित होऊन बाहेर पडले आणि सर्व समाजातील मुलांना शिक्षण मिळावे म्हणून जीवाचे रान करत त्यांनी रयत शिक्षण संस्थेची उभारणी केली.ही संस्था उभी करण्यात लक्ष्मीबाईंचाही मोलाचा वाटा आहे. विद्यार्थ्यांनीही कर्मवीरांचा शैक्षणिक कार्याचा वसा समर्थपणे पुढे चालू ठेवावा असे त्यांनी सांगितले. अश्वि पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक भंडारे साहेब यांनीही विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या प्रमुख वक्ते पोपटराव पवार यांनी आपल्या तडफदार व ओघवत्या शैलीतून विद्यार्थ्यांना मंत्रमुग्ध करत कर्मवीरांच्या शैक्षणिक, सामाजिक कार्याचा सविस्तर वृत्तांत सादर केला. या कार्यक्रमास बाळकृष्ण होडगर मामा, सुमतीलाल गांधी सुभाषराव म्हसे,मा.संचालक विनायकराव बालोटे, किशोर पाटील जऱ्हाड,तानाजी गायकवाड,दिलीप शेठ गांधी ब्रिजमोहनशेठ बिहानी,प्रशांत कोळपकर, केदारशेठ बिहानी,मा. प्राचार्य बी बी मांढरे,भीमाशंकर सारबंदे, भाऊसाहेब डोईफोडे,पत्रकार अशोक गोसावी पत्रकार संजय गायकवाड पत्रकार रवि बलोटे, पत्रकार अमोल राखपसरे,पत्रकार अनिल शेळके ,सुनील गायकवाड ,रामनाथ जऱ्हाड, अण्णासाहेब ताजणे,अंत्रे सर बाळासाहेब जाधव मा.उंबरकर सर पर्यवेक्षिका लोखंडे मॅडम, सर्व शालेय कमिटीचे मान्यवर पदाधिकारी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.या समारंभाचे सूत्रसंचालन गाडे मॅडम यांनी केले तर आभार प्रदर्शन सहाने मॅडम यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्राचार्य जनार्दन बर्डे पर्यवेक्षिका लोखंडे मॅडम सर्व माध्यमिक,उच्च माध्यमिक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी विशेष प्रयत्न केले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!