आ. सत्यजित तांबे वाढदिवसानिमित्त निमगाव जाळी येथे मोफत आयुष्यमान भारत गोल्डन कार्ड वाटप
निमगाव जाळी / लोकवेध live न्यूज / अशोक गोसावी
आज निमगाव जाळी येथे स्व वामनराव जोंधळे ग्रामीण बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या वतीने आमदार सत्यजित दादा तांबे यांच्या वाढदिवसानिमित्त *आयुष्यमान भारत गोल्डन कार्ड (5लाखापर्यंत मोफत उपचार कार्ड)* वाटप राजहंस दूध संघाच्या संचालिका तथा निमगाव जाळी ग्रामपंचायत लोकनियुक्त सरपंच सौ प्रतिभा सोमनाथ जोंधळे यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्ष रावसाहेब थेटे होते. त्याप्रसंगी विविध सेवा सोसायटी चे माजी चेअरमन रंगनाथ वदक, सुखदेव डेंगळे, विविध सेवा सह सोसायटीचे संचालक सोमनाथ जोंधळे, परशुराम जोंधळे, अशोक भोसले, ग्रा प सदस्य माऊली डेंगळे, भास्कर खरात, सौ.उषा पवार,एकनाथ खरात, तान्हाजी जोंधळे, सोमनाथ खरात, संजय वदक, रवी खरात,दत्तू तळोले, गोरख वदक अजय खरात, अशोक डेंगळे,माणिक जोंधळे,भीमा पवार, अण्णा थोरात, संदीप जोंधळे, विलास वदक,लक्ष्मण बिडवे आदी ग्रामस्थ व लाभार्थी उपस्थित होते. आभार तान्हाजी जोंधळे यांनी मानले.
