पोदार इंटरनॅशनल स्कूल ओझर विद्यालयातील विद्यार्थ्यांकडून श्रमदान

ओझर नाशिक / लोक वेध live न्यूज 

अन्नदान, रक्तदान यांच्या बरोबरीने श्रमदान देखील खूप महत्त्वाचे आहे. श्रमदान हे एकट्याने किंवा संघटितपणे करता येते. निरोगी आणि शांततापूर्ण जीवन जगण्यासाठी सर्वांनी स्वच्छतेचे महत्त्व समजून घेणे आणि ते कायम राखणे आवश्यक आहे. स्वच्छता एक महत्त्वपूर्ण विषय आहे ज्याची गंभीरता आज समजातील सर्व लोकांनी मानली आहे. स्वच्छता ही स्वस्थ आणि समृद्ध समाजाची मौल्यवान गुणवत्ता आहे. स्वच्छता आरोग्यमय वातावरणासाठी खूप महत्त्वाची आहे. श्रमदान आणि स्वच्छते विषयी जागरूकता निर्माण होण्यासाठी शैक्षणिक पातळीवर अनेक उपक्रम राबविले जातात. म्हणून गांधी जयंती निमित्ताने पोदार इंटरनॅशनल स्कूल ओझर विद्यालयातील इयत्ता नववी च्या विद्यार्थ्यांनी श्रमदानाचे कार्य उत्साहाने पार पाडले. याकरिता विद्यार्थ्यांनी विद्यालयाच्या जवळच असलेल्या जनशांतीधाम मंदिराचा आतील व बाहेरील परिसर झाडून स्वच्छ केला. विद्यार्थ्यां कडून सर्व केर कचरा व्यवस्थित रित्या कचरापेटीत टाकण्यात आला. विद्यार्थ्यांनी अतिशय मनःपूर्वक आणि उत्स्फूर्तपणे श्रमदानाचे कार्य पार पाडले. विद्यार्थ्यांना श्रमदानाचे महत्त्व समजावे हाच या कार्यक्रमाचा हेतू होता. यासाठी विद्यालयाचे क्रीडा शिक्षक राकेश शर्मा यांचे विद्यार्थ्यांना योगदान लाभले. कार्यक्रमासाठी विद्यालयाच्या प्राचार्या जसिंथा पारके यांचे बहुमोल मार्गदर्शन लाभले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!